3) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अथ प्रथमोऽध्यायः- अर्जुन विषाद योग






माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी


3) अथ प्रथमोऽध्यायः- अर्जुन विषाद योग


विषाद - म्हणजे दुःख किंवा दुखी मनामुळे आलेली निराशा
पहिला प्रसंग:- क्षेत्र आणि त्याबाबत माहिती

धृतराष्ट्र उवाच:
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय॥१-१॥

सर्व परिचित आहे कि भगवद्गीतेच्या पहिल्या प्रसंगात भूमिका स्पष्ट केली जात आहे कि हे कोणते युद्ध आहे? आणि कुठे चालू आहे? इथे समजण्यासारखा भाग हा आहे कि क्षेत्र हा उल्लेख दोन वेळा आला आहे पहिला उल्लेख धर्म-क्षेत्र आणि दुसरा कुरु-क्षेत्र. आपल्याला माहिती आहे कि कुरुक्षेत्र हि एक युद्धभूमी आहे जिथे कुरुवंशी योद्धे आपले कर्म (युद्ध) करत असत. इथे धर्म क्षेत्र हा शब्द समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला “क्षेत्र” हा शब्द भगवंताच्या सोबत अध्याय 13 मध्ये दिलेल्या श्लोकाआधारे समजून घ्यावा लागेल.

श्रीभगवानुवाच;
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥१३-१॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात. ॥१३-१॥

जर शरिर क्षेत्र आहे तर आपल्याला याच भूमिकेतून धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे शब्द समजून घेतले पाहिजेत. धर्म-क्षेत्र म्हणजेच शरीराचा धर्म आणि कुरुवंशी जिथे कर्म करायचे ते कुरुक्षेत्र म्हणजेच कर्म क्षेत्र. म्हणजेच भगवदगीता ७:४ श्लोकानुसार कर्म इंद्रिय आणि ज्ञानइंद्रिय व त्यातून उत्पन्न होणाऱ्या या दोन क्षेत्रामधील भूमी हि खरी युद्धभूमी आहे.
(1) वाणी
(2) हाथ
(3) पाय
(4) जननेन्द्रिय आणि
(5) गुदा हि पाच कर्मेंद्रिये (कर्म करणारे) आहेत.

तसेच,
(१) डोळा,
(२) कान,
(३) जीभ,
(४) त्वचा आणि
(५) नाक

हि पाच ज्ञानेंद्रिये (ज्ञान / माहिती ग्रहण करून मन / बुद्दीला देणारी) इंद्रिय आहेत. आणि सगळा खेळ या इंद्रियांचा व त्या मधून निर्माण होणाऱ्या विकार तथा इच्छांचा आहे. मनुष्य जेव्हा कर्मेन्द्रिय किंवा ज्ञानेन्द्रिय यांच्या प्रभावाखाली येतो त्याला अनेक आवडीच्या गोष्टी प्रति आसक्ती निर्माण होते. व नावडत्या गोष्टी  प्रति द्वेष निर्माण होतो आणि मग इच्छा आणि द्वेषाचा एक संघर्ष सुरू होतो म्हणजेच प्राप्त करण्याचा आणि टाळण्याचा एक संघर्ष सुरू होतो.

या संघर्षातूनच प्रकट होतात मनुष्याच्या वेगवेगळ्या भावना जसे की काम, क्रोध, मोह, माया, मत्सर आणि अहंकार.  हा लढा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा लढा आहे.  प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, किंबहुना प्रत्येक क्षणी त्याच्या अंतःकरणात ही लढाई चालू असते आणि यालाच आपण म्हणतो आपण चांगल्या वाईट किंवा  धर्म व अधर्म यांचा संघर्ष. काय केलं पाहिजे आणि कशाचा त्याग केला पाहिजे या विषयीचा जो अंतर्मनात लढा चालू असतो त्यातूनच कधीकधी अभिमान व पश्चाताप ह्या भावना पुढे येत असतात. जो मनुष्य हे द्वंद्व समजून योग्य पद्धतीने स्वधर्म पालन करतो तो मनुष्य निश्चितच मनस्वास्थ्य मनशांती सह प्रगती करण्यास योग्य ठरतो. याद्वारे मन, बुद्धी आणि अहंकार हे अष्टधा प्रकृतीमधील ३ महत्वपूर्ण घटक कार्यरत होतात. आणि याचा प्रत्यय भगवंताच्या अनेक श्लोकांमध्ये इंद्रियसंयमन विषयक आग्रहपूर्वक मार्गदर्शनातून दिसून येतो.


पुढील भागात आपण दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन पाहुयात

भाग 2)-
मांडणी, अभ्यासाची गरज आणि पात्रता:-http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post.html

भाग 4)- 
दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन आणि शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम

टिप्पण्या

  1. 'कर्मेन्द्रिय , ज्ञानेन्द्रिय व त्यातून उत्पन्न होणाऱ्या दोन क्षेत्रांमधील भूमी' ही संकल्पना मला स्पष्ट झाले नाही, कृपया समजून सांगावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रश्ना साठी धन्यवाद🙏🏻
      आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर विश्लेषण मध्ये अंतर्भूत केले आहे.
      धन्यवाद

      हटवा
    2. प्रश्ना साठी धन्यवाद🙏🏻
      आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर विश्लेषण मध्ये अंतर्भूत केले आहे.
      धन्यवाद

      हटवा
    3. प्रश्ना साठी धन्यवाद🙏🏻
      आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर विश्लेषण मध्ये अंतर्भूत केले आहे.
      धन्यवाद

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ