पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

43) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय अकरावा:- विश्वरूप दर्शन प्रारंभ; भक्तीभावाने समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी अध्याय अकरावा:- विश्वरूप दर्शन 43) भक्तीभावाने समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात मागील दोन अध्यायात भगवंतांनी जगाची उत्पत्ती-प्रलय, आणि श्रीभगवान विष्णूचे ऐश्वर्य वर्णन केले आणि एक अनन्यभक्तीने युक्त समर्पित भक्त म्हणून अर्जुन ( वाचक ) आता भगवंतांच्या रूपाच्या दर्शनासाठी उत्सुक झाला आणि त्याने भगवंताला विनंती केली ती अशी. अर्जुन उवाच; मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् । यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ ११-१ ॥ भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया । त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ ११-२ ॥ एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर । द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ११-३ ॥ मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो । योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ११-४ ॥ अर्जुन म्हणाला, हे परमेश्वर माझ्यावर कृपा करून आपण जे अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक ज्ञान मला दिले आहे, त्याने माझा अज्ञान रुपी मोह नाहीसा झाला आहे. हे कमलनयना, मी आपल्याकडून जीवांच्या उत्पत्ती आणि प्रलयाविषयी...

42) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 2)

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 42) भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 2) प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ १०.३० ॥ पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ १०.३१ ॥ मी दैत्यांमध्ये परमभक्त प्रह्लाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे. जलचरामध्ये मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे. सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ १०.३२ ॥ अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ १०.३३ ॥ मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ १०.३४ ॥ हे अर्जुना, सर्व सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा निर्णायक तर्क आहे.  मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द...

41) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 1)

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 41) भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 1) आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ १०.२१ ॥ वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः । इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १०.२२ ॥ रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ १०.२३ ॥ देवी अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आहे आणि तेजस्वी ज्योतींमध्ये सूर्य मी आहे. मरूदगणामध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील जीवशक्ती चेतना मी आहे. अकरा रुद्रांमध्ये महारुद्र शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. आठ वसू मधील अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मी सुमेरु पर्वत आहे. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ १०.२४ ॥ महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ १०.२५ ॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।  गन...

40) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?  अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् । पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १०.१२ ॥ आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १०.१३ ॥ सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव । न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १०.१४ ॥ स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १०.१५ ॥ वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १०.१६ ॥ कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।  केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०.१७ ॥ विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।  भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १०.१८ ॥ भगवंताचे बोल ऐकून अर्जुन म्हणाला; हे भगवंत, आपण परम ब्रह्म परमेश्वर, परम धाम, आणि परम पवित्र व अंतिम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, सनातन, आदिपुरुष, अजन्मा, आहात. इथे अर्जुन श्रुती ज्ञान ( जेष्ठाकडून ऐकलेले ) सांगतो. अर्जुन म्हणाला कि मी हे सर्...

39) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय दहावा:- विभूतियोग प्रारंभ

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 39) अध्याय दहावा:- विभूतियोग मागील अध्यायात आपण परम गोपनीय ज्ञान, जगाची उत्पत्ती व अंत, आस्तिक आणि नास्तिक प्रवृत्ती, सत्य नेमकं काय आहे, सकाम आणि निष्काम करम करण्याचे फळ, देवतांची उपासना, अनन्यभावाने निष्काम भगवद्भक्तीची महिमा याविषयी भगवंतांची वाणी ऐकली. आता या अध्यायात भगवंताच्या विभूतींविषयी जाणून घेऊया. श्रीभगवानुवाच ; भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०.१ ॥ न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०.२ ॥ यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०.३ ॥ बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः । सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०.४ ॥ अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०.५ ॥ महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०.६ ॥ एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०.७ ॥ या अध्यायाच्या पहिल्...

38) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भक्तीचा दुराचारी व्यक्तीवरील प्रभाव आणि भगवंताचे अनन्य भावाने भक्तीकरणाऱ्या भक्ताला वचन.

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 38) भक्तीचा दुराचारी व्यक्तीवरील प्रभाव आणि भगवंताचे अनन्य भावाने भक्तीकरणाऱ्या भक्ताला वचन. अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ९-३० ॥ क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ९-३१ ॥ मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌ ॥ ९-३२ ॥ किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥ ९-३३ ॥ मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ९-३४ ॥ जर एखादा अत्यंत दुराचारी, दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजत असेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया, तू हे निर्भय होऊन हे घोषित कर कि,  माझा भक्त कधीच नाश पावत नाही. हे पार्था, व्यक्...

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 37) या भागात भगवंत सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ या विषयी मार्गदर्शन करतात. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ ९-२० ॥ ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ ९-२१ ॥ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥ येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ ९-२३ ॥ अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।  न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ ९-२४ ॥ यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।  भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ ९-२५ ॥ तिन्ही वेदात सांगितलेली कर्मे करणारे, सोमरस पिणारे,पापमुक्त लोक यज्ञांनी माझी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात; ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या इंद्रलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्व...

36) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- नास्तिक व्यक्ती त्यांची विचारधारा व फळ, आस्तिक व्यक्ती आणि त्यांची विविध श्रद्धा

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 36) नास्तिक व्यक्ती, त्यांची विचारधारा व फळ आणि आस्तिक व्यक्ती, त्यांची विविध श्रद्धा अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ९.११ ॥ मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९.१२ ॥ महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ ९.१३ ॥ सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ ९.१४ ॥ ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ ९.१५ ॥ या भागात अतिशय सुलभ पद्धीतीने इथे भगवंत नास्तिक व्यक्ती त्यांची विचारधारा व फळ आस्तिक व्यक्ती आणि त्यांची विविध  श्रद्धा समजून सांगतात. परमेश्वर म्हणतात माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला महान ईश्वराला तुच्छ समजून उपहास करतात.  अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मज परमेश्वराचे सामान्य मनुष्य रूप पाहताना त्यांना माझ्या दिव्य स्वरूपाची जाण होत नाही. मायेच्...

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग अध्याय ९ च्या सुरुवातीला भगवंत अर्जुनाला सांगतात कि मी आता तुला परम गोपनीय ज्ञान उपदेश करणार आहे. श्रीभगवानुवाच ; इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥9.1॥ राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥9.2॥ अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥9.3॥ मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः ॥9.4॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥9.5॥ यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।  तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥9.6॥ श्रीभगवान म्हणाले, तू माझा कधीच द्वेष करत नाहीस आणि तू माझा समर्पित भक्त असल्याने हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. इथे हे ज्ञान समजण्यासाठीची पात्रता आपल्याला कळते. केवळ समर्पित भक्तच हे ज्ञान समजू शकतो. हे ...

34) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 34) प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन यत्र काले त्वनावत्तिमावृत्तिं चैव योगिनः । प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ৷৷8.23৷৷ अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्‌ । तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ৷৷8.24৷৷ धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम्‌ । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ৷৷8.25৷৷ शुक्ल कृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्ति मन्ययावर्तते पुनः ৷৷8.26৷৷ नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ৷৷8.27৷৷ वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्‌ । अत्येत तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्‌ ৷৷8.28৷৷ ८ व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत प्रयाण काळाची वेळ आणि त्याचा परिणाम याचे वर्णन केले आहे. आणि कोणता मार्ग वापरणारे परत येतात व कोणता मार्ग वापरणारे परत येत नाहीत.  भगवंत सांगतात, जे परम ब्रम्हाला जाणतात आणि अग्निदेवतेच्या प्रभावात, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात अस...

33) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- योग सिद्ध मनुष्याची गति

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 33) योग सिद्ध मनुष्याची गति अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्‌ ॥8.8৷৷ कविं पुराणमनुशासितार-मणोरणीयांसमनुस्मरेद्यः । सर्वस्य धातारमचिन्त्यरूप-मादित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ৷৷8.9৷৷ प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्‌- स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्‌ ৷৷8.10৷৷ या भागात भगवंत सांगतात कि आपण भगवंताला कोणकोणत्या रूपात पाहू शकतो. आणि कोणकोणत्या प्रकारे भगवंताची पूजा करू शकतो. प्रथम आपण भगवंताची रूपे पाहूया. भगवंत म्हणतात हे पार्थ अभ्यासपूर्वक मन एकाग्र करून मनाला जो पुरुष भगवंतामध्ये स्थिर करतो आणि सतत भगवंताचे स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. आधुनिक अर्जुन हाच नियम सर्व प्रकारच्या ध्येय प्राप्तीसाठी वापरू शकतात. भगवंत सांगतात कि मला सर्वत्र, पुरातन, सर्वांचा नियामक, अणूपेक्षाही अतिसूक्ष्म, सूर्यापेक्षाही तेजस्वी, सर्वांचा पालनकर्ता, सर्व भौतिक कल्पनांच्या पलीकडील दिव्या अश्या नित्य पुरुष स्वरूपात ध्यान केले पाहिजे म्हणजेच परमेश्वर यत्र तत्र...

32) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 32) अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न अर्जुन उवाच, किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते৷৷8.1৷৷ अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥8.2৷৷ जसा जसा आपला अर्जुनरूपी श्रीभगवद्गीता अभ्यासाचा प्रवास पुढे जात आहे त्यानुसार अनेकानेक नवनवीन प्रश्न आणि त्याची अतिशय स्पष्ट उत्तरे आपल्यासमोर येतांना दिसत आहेत. याप्रमाणेच ८ व्या अध्यायाची सुरुवात अर्जुन सात अतिशय महत्वाच्या प्रश्नांनी करतोय. आपण अर्जुन होऊयात आणि ती प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेऊयात. अर्जुनाने विचारले - हे पुरुषोत्तम! ब्रह्म म्हणजे नेमके काय ? अध्यात्म काय आहे? कर्म कशाला म्हणायचे? अधिभूत काय आहे? आणि अधिदेवता कुणाला म्हंटले जाते? अधियज्ञ म्हणजे कोण? आणि तो या शरीरात कसा वास करतो आणि भक्तीमध्ये लिन झालेले तुम्हाला अंतिमसमयी कसे समजू शकतात? श्रीभगवानुवाच , अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म...

31) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 31) भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्‌ ॥२४॥ नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्‌ ॥२५॥ वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥२६॥ अध्याय 7 च्या शेवटच्या भागात भगवंत सांगतात की, अज्ञानी लोक त्यांच्या अज्ञानामुळे मला अविनाशी आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराला जाणत नाहीत. ते केवळ मला माझ्या मनुष्य रूपात पाहतात. मूढ तथा अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, म्हणजेच मी सर्वत्र असुनही ते मला पाहू शकत नाहीत. माझ्या अंतरंगा शक्तीमुळे मी त्यांच्यासाठी सदैव अप्रकटच राहतो आणि ते माझे अजन्मा आणि अच्युत स्वरूप जणू शकत नाहीत. हे अर्जुन मी परमेश्वर आहे आणि मी भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानात घडणारे सर्व आणि भविष्यात घडणारेही सर्व काही जाणतो. कारण सर्व जीव माझ्या प्रकृतीने बनलेले आहेत आणि मी सर्व जीवांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाही. जसे आपण जेव्हा पाणी फ्रिज मध्य...

30) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंत भक्तांची स्तुती व नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 30) भगवंत भक्तांची स्तुती व नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्‌ । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्‌ ॥१३॥ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥ न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥१५॥ चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥१६॥ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥१७॥ उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्‌ ।  आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्‌ ॥१८॥ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।  वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥१९॥ त्रिगुणांनी मोहित झालेले हे जग म्हणजेच त्रिगुणांच्या प्रभावाखाली कार्य करणारे सर्व जगत, मला गुणातीत आणि अविनाशी अश्या परमेश्वराला जाणत नाहीत.  तीन दैवी गुणांनी युक्त माझी दैवी शक्ती आहे आणि हि मायाशक्ती एवढी प्रबळ आहे कि तिला पार करणे कोणत्याही जीवाला अतिशय कठीण आहे प...

29) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय 7 प्रारंभ :- विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 29) अथ सप्तमोऽध्यायः- ज्ञानविज्ञानयोग विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता श्रीभगवानुवाच , मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥१॥ ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः । यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥२॥ मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः ॥३॥ भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहङ्‍कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥४॥ अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌ ॥५॥ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥६॥ मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥७॥ मागील अध्यायात भगवंत श्रीकृष्ण म्हणाले कि, योगी व्यक्ती सर्व जीवांना समभावाने पाहतो आणि प्रत्यक्ष जीवांमध्ये परमेश्वर आणि परमेश्वराला प्रत्यक्ष जीवांमध्ये पाहतो, आणि जो अश्याप्रकारे पाहतो त्याच्यासाठी परमेश्वर अदृश्य नसुन सर्वत्र प्रत्यक्ष प्रकट स्वरूपात असता...