74) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात - तीन प्रकारचे कर्म
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 74) तीन प्रकारचे कर्म नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम। अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते৷৷१८.२३৷৷ यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः। क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्৷৷१८.२४৷৷ अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते৷৷१८.२५৷৷ आता आपण तीन प्रकारचे कर्म समजून घेऊया. भगवंत म्हणाले. जे कर्म नियत कर्म आहे म्हणजेच कर्तव्य भावनेने उत्पन्न झाले आहे. जे करतांना कोणतीही फलाची आसक्ती नाही आणि त्या कर्माशी कोणतेही राग अथवा द्वेष भाव नाहीत अश्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. आणि जे कर्म निश्चित फल प्राप्तीसाठी मोठयाप्रमाणात अविरत श्रम घेऊन मी हे करणार, मी ते करणार ह्या अहंकार भावाने केले जातात त्या कर्माला राजसी कर्म असे म्हणतात. लोभ आणि मोह ज्याचा पाय आहे आणि जे शास्त्राच्या तत्वांना डावलून परिणामांकडे दुर्लक्ष करून हिंसा ( मानसिक तथा शारीरिक ) दुसऱ्यांच्या भावनां दुखावणारे ई कर्म हे तामसी कर्म जाणावेत. ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश्वर चान्ने भाग 73) तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता...