पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

90) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- special episode 4

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 90) अध्याय २ श्लोक ४७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥२.४७॥ मनस्वास्थ आणि मनःशांतीपूर्वक उन्नतीसाठी भगवंतांनी हा सर्वोत्तम मार्ग संगीतला आहे, ||२.४७|| कि नियत कर्म करणे मनुष्याच्या अधिकारात आहे आणि त्या कर्माच्या फळावर मात्र मनुष्याचा अधिकार नाही. भगवंत स्पष्ट करतात कि कोणताही मनुष्य हा त्याच्या कर्मफलास कारणीभूत नसतो तो केवळ कर्म करू शकतो आणि त्याने स्वतःला कर्म आणि कर्मफळाचा अधिकारी समजून नये तसेच कर्म न करण्याचा विचार सुद्धा करू नये किंवा कर्म न करण्याच्या मोहात सुद्धा पडू नये. ||२.४७|| ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश्वर चान्ने भाग 89) special episode 3- अध्याय २ श्लोक ४१ http://nisha-channe.blogspot.com/2021/08/89-special-episode-3.html

89) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- Special episode 3

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 89) अध्याय २ श्लोक ४१ व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाका ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥२.४१॥ जे व्यक्ती निष्काम कर्म करतात ते दृढनिश्चयी व्यक्ती आपले सगळे ध्यान एकाच विषयात केंद्रित करतात आणि प्रगती करतात. तर डळमळीत वृत्तीचे व्यक्ती आपले ध्यान अनेकानेक विषयात गुंतवत असतात आणि अश्या व्यक्तीच्या बुद्धीला अनेक फाटे असतात व अश्या व्यक्तीला प्रगती करणे अवघड असते. त्यामुळे आपल्या भगवंतांनी दिलेल्या क्षमतेनुसार निःकाम भावनेने ध्यान एकाच विषयात केंद्रित करून नियत नित्य कर्म करत राहणे हेच श्रेयस्कर आहे. ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश्वर चान्ने भाग 88) special episode 3- अध्याय २ श्लोक २३ http://nisha-channe.blogspot.com/2021/08/88-special-episode-2.html

88) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- special episode 2

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 88) अध्याय २ श्लोक २३ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।  न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२.२३॥ गीतेचे अवतरण होत असलेल्या या भागात भगवंत जगातील परमसत्य सांगताना दिसतात, इथे परमेश्वर भगवान कृष्ण सांगतात कि आत्मा म्हणजेच कोणत्याही जीवाच्या शरीरातील चेतना ज्याला जीवन ऊर्जा किंवा जीवात्मा सुद्धा म्हटले जाते त्याला कोनोही मारू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, हा आत्मा (जीवन ऊर्जा) केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि सदैव चिरंतन असे त्याचे अस्तित्व आहे. हा योगायोग आहे का आणखी काही हे वाचकांनी ठरवलेले ज्यास्त संयुक्तिक ठरेल कि थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे. उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो. विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते. ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद...

87) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- Special episode-1

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी (भाग 87) Special episode-1 कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥२.७॥ न हि प्रपश्यामि ममापनुद्या- द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् । अवाप्य भूमावसपत्रमृद्धं- राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥२.८॥ हा कोणत्याही ज्ञानार्थी शिष्यासाठी अतिशय महत्वाचा श्लोक आहे असे माझे मत आहे, या श्लोकात अर्जुन पूर्ण समर्पण करून भगवंताचे शिष्यत्व घेऊन योग्य मार्गदर्शनाची प्रार्थना करतांना दिसतो. इथे अर्जुनाची भूमिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जुन म्हणाला, हे माझ्या मनाच्या दुर्बलतेमुळे माझी स्मृती नष्ट झाली आहे, मला काय योग्य आणि काय आयोग्य याचे भान राहिलेले नाही त्यामुळे, हे मधुसूदन कृपया मला आपला शिष्यत्व देऊन माझ्यासाठी काय योग्य आहे याचे मार्गदर्शन करावे. वाचक मित्रांनो जीवनात प्रगतीचा राजमार्ग या श्लोकात दिसून येतो. जीवनात अनेक वेळा आपण अज्ञान, मनाची दुर्बलता, परिस्थिती तसेच भावनाच्या ओघात पदभ्रष्ट होतो आणि अश्या वेळी अज्ञानी लोक स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यात वेळ वाय...

86) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य (भाग 2)

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 86) श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य (भाग 2) संजय उवाच; इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः । संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ৷৷18.74৷৷ व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् । योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्৷৷18.75৷৷ राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ৷৷18.76৷৷ तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः । विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ৷৷18.77৷৷ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ৷৷18.78৷৷ संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्रीवासुदेव आणि पार्थ यां दोन महात्म्यांच्या हा अद्भुत आणि रोमहर्षक असा संवाद ऐकला. इथे संजय महात्मा वेद व्यास यांना धन्यवाद देतात आणि म्हणतात की, श्रीव्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग संवाद स्वतः भगवंत योगेश्वर श्रीकृष्णांकडून अर्जुनाला सांगत असताना प्रत्यक्ष ऐकला आहे. इथे चांगला गुरु किंवा संतांच्या कृपाशिर्वादाची गरज स्पष्ट होते. ज्यांच्याकडे दिव्य गुरूंचा आशीर्वाद आहे त...

85) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 85) श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।  न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ৷৷१८.६७৷৷ य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।  भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ৷৷१८.६८৷৷ न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।  भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ৷৷१८.६९৷৷ अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।  ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ৷৷१८.७०৷৷ श्रद्धावाननसूयश्च श्रृणुयादपि यो नरः ।  सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ৷৷१८.७१৷৷ आता भगवंत श्रीमद्भगवद्गीता महात्म्य सांगत आहेत कि, जे तप करत नाहीत, भगवंतांना मानत नाहीत, भग्नावतांचा द्वेष करणारे, भगवंत भक्तीमध्ये संलग्न नसलेले अश्या सर्व व्यक्तींना हे गुह्य असे गीतारहस्य कधीही सांगू नये. इथे माझी भगवदगीता लिहितांना मी सुरुवातीलाच पात्रता हा विषय लिहिला आहे आणि त्यात ज्यांच्या ज्ञानावर मोहाचा पडदा पडला आहे अश्या धार्तराष्ट्र सम व्यक्तींना भगवद्गीता ऐकण्याची सर्वात ज्यास्त गरज आहे पण आपण सर्व जाणतो कि प्रथम तीन व्यक्तीमध्ये भगवद्गीता...

84) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीभगवानकृष्णांनी दिलेला अंतिम उपदेश

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 84) श्रीभगवानकृष्णांनी दिलेला अंतिम उपदेश सर्वगुह्यतमं भूतः श्रृणु मे परमं वचः । इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ৷৷१८.६४৷৷ मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।  मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ৷৷१८.६५৷৷ सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।  अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ৷৷१८.६६৷৷ अर्जुनरूपी वाचकाला उद्देशून केलेला हा अंतिम उपदेश आहे, श्रीभगवान कृष्ण म्हणाले, तू मला अत्यंत प्रिय असल्यामूळे . भगवंताला प्रिय कोण आहे याचे वर्णन भगवंतांनी याआधीच  ॥ १२-१३ ॥ आणि  ॥ १२-१४ ॥ मध्ये केलेले आहे  ( अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥  सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।  मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥ )  मी तुला सर्व ज्ञानातील अतिशय मौल्यवान आणि गुप्त असे ज्ञान पुन्हा एकदा निश्चयपूर्वक सांगतो ते तू स्वतःच्या भल्यासाठी पुन्हा एकदा ऐक. माझी अनन्यभावाने भक्ती कर, माझी पूजा कर, मला नमस्कार कर यामुळे तू नक्कीच मला प्राप्त होशील हे मी तुला सा...

83) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचा अंतिम कर्मनिर्देश

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 83) श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचा अंतिम कर्मनिर्देश ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽजुर्न तिष्ठति। भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारुढानि मायया৷৷१८.६१৷৷ तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्৷৷१८.६२৷৷ इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ৷৷१८.६३৷৷ भगवंत पुढे सांगतात, हे अर्जुन! मी परमात्मा प्रत्येक जिवाच्या हृदयात वास करत असून, माझ्या मायेच्या शक्तीने सर्व जीवांना यंत्रवत चालवत आहे. किती सत्य आहे कि प्रत्येक जिवाच्या शरीरात असलेले हृदय आयुष्यभर अविरत चालत असते आणि हि ईश्वराची माया नव्हे तर दुसरे काय आहे, आता आपल्या आधुनिक विज्ञानाला हृदय स्पंदनांचे उगमस्थान उमगले आहे. पण ह्याचा नेमका उल्लेख हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेच्या या श्लोकात असणे म्हणजे त्याकाळी मनुष्याला ईश्वर वाणीतून मिळालेले ज्ञान किती अचूक आहे याचा हा आणखी एक प्रत्यय श्रीमदभगवद्गीतेच्या या शेवटच्या चरणात आपल्याला येतो. हे सर्व ज्ञान सांगितल्यावर भगवंत आपला श्रीमदभगवद्गीतेतील अंतिम कर्मनिर्देश सांगतात. भगवंत म...

82) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भक्ति सहित कर्मयोग चा विषय

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 82) भक्ति सहित कर्मयोग चा विषय सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः। मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्৷৷१८.५६৷৷ चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः। बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव৷৷१८.५७৷৷ मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि। अथ चेत्वमहाङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि৷৷१८.५८৷৷ यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ৷৷१८.५९৷৷ स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ৷৷१८.६०৷৷ श्रीमद्भगवद्गीतेच्या अंतिम चरणात आता भगवंत अर्जुनाला ( म्हणजेच वाचक रुपी पार्थाला नेमके काय केले पाहिजे याचा उपदेश देतात) तो आता आपण सर्वजण शांत आणि एकाग्रचित्ताने समजून घेऊया. भगवंत म्हणले सर्व प्रकारची नियत कर्में मला अर्पित कर आणि माझ्या आश्रयाखाली कर्म करत रहा, असे केल्याने तुला माझे शाश्वतधाम, म्हणजेच मनस्वास्थ मनशांती आणि प्रगती प्राप्त होईल. सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे म्हणजेच हे लक्षात ठेव कि सर्व यज्ञाचा भोक्ता मीच आहे आणि तू तुझी सर्व कर...

81) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- दिव्यज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती विषयक मार्गदर्शन

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 81) दिव्यज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती विषयक मार्गदर्शन असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः। नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति৷৷18.49৷৷ सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे। समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा৷৷18.50৷৷ बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च। शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च৷৷18.51৷৷ विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानस। ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः৷৷18.52৷৷ अहङकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्। विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते৷৷18.53৷৷ ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।  समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्৷৷18.54৷৷ भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।  ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्৷৷18.55৷৷ आता भगवंत मनुष्यासाठी सर्वोत्तम अशी मुक्तीची (बंधनमुक्त) अवस्था प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन करतात, भगवंत सांगतात जो सर्व भौतिक भोगांना महत्व न देता हिन लेखतो, जो आत्मसंयमनाद्वारे सर्व इंद्रियभोगांच्या ईच्छाप्रती अनासक्त भाव ठेवतो तो ...

80) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी कसा प्राप्त करू शकतो

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 80) वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी कसा प्राप्त करू शकतो स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः। स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु৷৷१८.४५৷৷ यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्।  स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः৷৷१८.४६৷৷ श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।  स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्৷৷१८.४७৷৷ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।  सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः৷৷१८.४८৷৷ मनुष्याचे गुणकर्मानुसार चार वर्ण सांगितल्यानंतर भगवंत सांगतात कि, वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो आणि ते कसे शक्य आहे हे आता तू माझ्याकडून ऐक. असे म्हणून भगवंत सांगतात कि सर्वजीवांचे बीज आणि कारणस्वरूप असलेल्या सर्वव्यापी असलेल्या मज भगवंताची पूजा करून आणि आपले स्वकर्म करून सर्व मनुष्य मग ते कोणत्याही वर्णाचे असोत ते सिद्धी प्राप्त करू शकतात. याबाबत पूर्वीसुध्दा भगवंतांनी मार्गदर्शन केलेले आहे  तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्म...

79) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- फल सहित वर्ण धर्म चा विषय

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 79) फल सहित वर्ण धर्म चा विषय ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप। कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः৷৷१८.४१৷৷ शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च। ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ৷৷१८.४२৷৷ शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्। दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्৷৷१८.४३৷৷ कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्। परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्৷৷१८.४४৷৷ प्रकृतीच्या तिन्ही गुणांचा मनुष्याच्या जीवनावर होणारा विविध प्रकारचा प्रभाव सांगितल्यानंतर भगवंत आता मनुष्याचे चार वर्ण याविषयी पुन्हा एकदा सांगतात, भगवंत म्हणाले कि हे परंतप, मनुष्याचे चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे सुद्धा वर्गीकरण प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे उत्पन्न स्वभावानुसार केले गेले आहे. याविषयी भगवंतांनी भगवद्गीता अश्या ४. श्लोक १३ मध्ये सुद्धा याचे वर्णन केलेले आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।४.१३।। आता अध्याय आठ मध्ये भगवंत प्रकृतीच्या गुणांना अनुसरून त्यांची कर्...

78) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सुख आणि सुखाच्या तीन प्रकारांची माहिती

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 78) सुख आणि सुखाच्या तीन प्रकारांची माहिती सुखं त्विदानीं त्रिविधं श्रृणु मे भरतर्षभ। अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति৷৷१८.३६৷৷ यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्। तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्৷৷१८.३७৷৷ विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्। परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्৷৷१८.३८৷৷ यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः। निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्৷৷१८.३९৷৷ न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः। सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिःस्यात्त्रिभिर्गुणैः৷৷१८.४०৷৷ सुखांच्या तीन प्रकारांची माहिती देतांना भगवंत म्हणतात. हे भारतश्रेष्ठ! भौतिक प्रकृतीशी जोडले गेलेले बद्ध जीव जे तीन प्रकारचे सुख उपभोगतात आणि ज्यमुळे दुखाःचा अंत ( बरेचदा तात्पुरता अंत ) होतो त्या तीन प्रकारच्या सुखाविषयी आता माझ्याकडून ऐक. जे सुख कार्याची सुरुवात करतांना अतिशय कष्टप्रद व विषासमान असहनीय वाटते परंतु शेवटी अमृतासमान गोडी आणि सुख देते जे मनुष्याला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देते आणि आत्मसाक्षात्काराची जाणीव घडवते त्या सुखाला सात्विक सुख म...

77) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 77) निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकार त्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।  योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ৷৷१८.३३৷৷ यया तु धर्मकामार्थान्धत्या धारयतेऽर्जुन।  प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी৷৷१८.३४৷৷ यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च।  न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी৷৷१८.३५৷৷ भगवंत आता निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार असलेले तीन प्रकार सांगतात. भगवंत म्हणाले, हे पार्था, जो अटल आहे, ध्यान प्रक्रियेने दृढ केलेला आहे, मन, प्राण आणि इंद्रियांच्या नियंत्रणाने धारण केलेला निश्चय सात्त्विक होय. परंतु हे अर्जुना!, ज्या निश्चयाने मनुष्य सकाम कर्मात गुंतत जातो जसे धार्मिकता, धन आणि इंद्रियतृप्तीसाठी उत्पन्न झालेल्या नवनवीन इच्छा व त्यापासून मिळणाऱ्या फळांना आसक्त होतो तो निश्चय राजसी होय. हे पार्थ! जो निश्चय मनाचे विविध खेळ जसे कि भय, स्वप्न, आशा, विषाद, मोह ई च्या पलीकडे जात नाही असा कधीही वास्तवात न येणारा निश्चय तामसी निश्चय होय. ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता रा...

76) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- बुद्धीचे व धृतीचे भेद

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 76) बुद्धीचे व धृतीचे भेद बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श्रृणु । प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय॥ १८-२९ ॥ भगवंत पुढे म्हणाले, हे धनंजया! प्रकृतीच्या तीन गुंनुसार आता मी बुद्धीचे व धृती ( दृढनिश्चय ) याचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक तू ऐक. प्रवत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये। बन्धं मोक्षं च या वेति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥ यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च। अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी॥ १८-३१ ॥ अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता। सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी॥ १८-३२ ॥ हे पार्थ! ज्या बुद्धीद्वारे प्रवृत्ती आणि निवृत्ती, करण्यास योग्य आणि अयोग्य ( करणीय व अकरणीय), भय आणि निर्भयता, बंधन आणि मुक्ती यातील भेद जाणतो ती बुद्धी सात्विक बुद्धी होय. शास्त्रानुसार स्थळ, वेळ परत्वे मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीसाठी, योग्य, अयोग्य निर्णय घेण्यासाठी मदतगार ठरते ती बुद्धी सात्विक होय. हे पार्था, ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यातील भेद मनुष्य जाणू शकत नाही, ती बुद्धी रा...

75) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्ता व त्याचे तीन प्रकार

इमेज
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी 75) कर्ता व त्याचे तीन प्रकार मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । सिद्धयसिद्धयोर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते৷৷१८.२६৷৷ रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः। हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः৷৷१८.२७৷৷ आयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठोनैष्कृतिकोऽलसः । विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते৷৷१८.२८৷৷ आता आपण कर्ता व त्याचे तीन प्रकार बघुयात जो कर्ता गुणांचा संग न बाळगता म्हणजेच सवयींना बळी न पडता, आसक्ती न बाळगता, स्वामित्व व अहंकारभाव न बाळगता , धैर्य व उत्साहाने, कार्य होईल अथवा न होईल याची व्यर्थ तमा न बाळगता, आपले कर्म करतो त्याला तो सात्त्विक कर्ता मानावे. जो कर्ता आसक्तीयुक्त असून, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगतो, लोभ,मत्सर,ईर्षा  सुखदुःख भाव असलेला, अशुद्ध आचरणाचा असा कर्ता राजस म्हटला जातो. शास्त्र संकल्पना आणि मार्ग याच्या विरुद्ध कार्य करणारा भौतिक सुखात लिप्त, हट्टी, धूर्त, अनिष्ट ते कृत्य करणारा, आळशी, दुःख कवटाळून धरणारा, कामामध्ये तत्पर नसलेला कर्ता तामस म्हटला जातो ।।जय श्री कृष्णा।। धन्यवाद🙏🏻😇 निशा सुजाता राजेश...