44) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

44) विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले

सञ्जय उवाच;

एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ११-९ ॥

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ ११-१० ॥

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११-११ ॥

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुस्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ ११-१२ ॥

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥ ११-१३ ॥

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥ ११-१४ ॥

संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर वरील प्रमाणे सांगून अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि आपले परम ऐश्वर्ययुक्त दिव्य, विराट असे विश्वस्वरूप दाखविले. या रूपात अर्जुनाने अनेक मुखे व डोळे असलेल्या, अनेक विस्मयचकित करणारी दर्शने पहिली, अनेकानेक दिव्य अलंकार धारण केलेली आणि अनेकानेक दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य वस्त्रे व माळा धारण केलेल्या, तसेच विविध दिव्य सुगंधी गंधाने विभूषित रूप पहिले. या रूपाचे तेज कदाचित एकाच वेळी सहस्त्रसूर्य उदय झाल्यास जे तेज उत्पन्न झाल्यास दिसेल असे होते. या रूपामध्ये अर्जुनाने भगवंतामध्ये स्थित असलेली अनंत अशी ब्रह्मांडे व ग्रह पाहिले. हे रूप एवढे विशाल आणि विस्मयचकित करणारे होते कि अर्जुन भ्रमित होऊन नतमस्तक झाला आणि त्याने परमेश्वराची स्तुती आणि प्रार्थना करावयास सुरुवात केली.

अर्जुन उवाच;

पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च
सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ ११-१५ ॥

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं
पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं
पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥ ११-१६ ॥

किरीटिनं गदिनं चक्रिणं च
तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ ११-१७ ॥

त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ ११-१८ ॥

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम्
अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं
स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ ११-१९ ॥

अर्जुन प्रार्थना करत असतांना वर्णन करतो कि तो परमेश्वर भगवंतांमध्ये कोणकोणती रूपे पाहत आहे.

याचे वर्णन आता वाचकांसमोर प्रस्तुत करत आहे. अर्जुन म्हणाला, हे भगवान कृष्ण, मी तुमच्या देहात सर्व देवतांना तसेच इतर अनेक भुतांना पाहतोय, कमळावर आसनस्थ ब्रह्मदेव, भगवान शंकर, सर्व ऋषीमुनी तसेच दिव्य सर्पांना पाहतोय. हे विश्वेश्वर तुमच्या या विश्वरूपी अमर्याद देहात मला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे दिसतात.

तुमचे हे रूप अनंत आहे मला याची सुरुवात, मध्य तसेच अंत दिसताच नाही खरंच हे रुप खूप विशाल आणि अमर्याद आहे. अर्जुन पुढे म्हणाला मुकुट, गदा, चक्र धारण केलेले सूर्याच्या अत्यंत प्रखर तेजाप्रमाणे हे अत्यंत तेजस्वी रूप आहे. हे दृश्य पाहत असतांना अर्जुन भगवंत स्तुती करतो. अर्जुन म्हणाला हे भगवंत तुम्ही अक्षर, परम जाणण्यायोग्य आहात. तुम्ही अविनाशी आणि पुरातण आहात. तुम्हीच सनातन धर्माचे पालक तुम्हीच परम भगवंत आहात, असे माझे मत आहे.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 43) अध्याय अकरावा:- विश्वरूप दर्शन प्रारंभ; भक्तीभावाने समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ