50) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कोणता भक्त भगवंताला प्रिय आहे
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
50) कोणता भक्त भगवंताला प्रिय आहे
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥
१२-१३ ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥
या भागात परमेश्वर त्यांना अत्यंत प्रिय कोण आहे याचे वर्णन करतात. म्हणजे परमेश्वर सांगत आहेत कि कोण परमेश्वर ( ध्येय ) प्राप्ती साठी अधिक योग्य आहे. भगवंत सांगतात, जो कोणत्याही भूताचा द्वेष करत नाही, सर्वांचा स्वार्थरहित मित्र आहे. जो अहंकार आणि स्वामित्वभावापासून दूर आहे. सुखदुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही पच्छाताप केल्यानंतर अभय देणारा असतो; जो योगी नेहमी माझी अनन्य भावाने भक्ती करतो तो मला अत्यंत प्रिया आहे.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥
ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच तो स्वतःही इतर जीवांमुळे उदविग्न होत नाही, जो हर्ष, दुःख, भीती आणि चिंता इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥
कशाचीही अपेक्षा नसलेला, अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त असलेला, फल प्राप्तीसाठी असलेल्या सर्व आरंभाचा त्याग करणारा मजाही भक्त मला अत्यंत प्रिया आहे.
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७ ॥
आनंदी किंवा दुखी न होणारा शोक न करणारा तसेच आकांक्षा न बाळगणारा. शुभाशुभ गोष्टींचा त्याग करणारा असा तटस्थ भक्त मला अत्यंत प्रिय आहे.
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ १२-२० ॥
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥
जो शत्रू-मित्र, मान-अपमान, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत समभाव बाळगतो ज्याची वृत्ती सारखीच राहते. कुसंगापासून दूर राहणारा, सदैव शांत राहणारा, आहे त्यात संतुष्ट राहणारा, घर दाराची आसक्ती न बाळगता ज्ञानामध्ये स्थित राहून सदैव माझ्याभक्तीमध्ये संलग्न राहणारा असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजेच जे श्रद्धाळू पुरुष भक्तीभावाने या वर सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण करतात आणि मला परमलक्ष मानून माझी अनन्य भावाने भक्ती करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत.
ॐ हे परमसत्य आहे.
याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा हा बारावा अध्याय समाप्त झाला. ॥ १२ ॥
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 49) ध्येय प्राप्तीमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करायच्या पद्धती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा