22) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ५ कर्मसंन्यासयोग प्रारंभ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
22) अध्याय ५
अथ पंचमोऽध्यायः- कर्मसंन्यासयोग
भाग १ ज्ञानयोग कर्मयोग दोन्हीची
उपयुक्तता आणि कर्मयोगाची श्रेष्ठता
अर्जुन उवाच:
सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥१ ॥
श्रीभगवानुवाच:
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥२ ॥
ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥३ ॥
साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥४ ॥
यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्यौगैरपि गम्यते
। एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥५ ॥
सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥६ ॥
अथ पंचमोऽध्यायः- कर्मसंन्यासयोग
भाग १ ज्ञानयोग कर्मयोग दोन्हीची उपयुक्तता आणि कर्मयोगाची श्रेष्ठता
आतापर्यंत अविनाशी आत्मा, नाशवंत शरीर, स्थितप्रज्ञ, कर्म, अकर्म, विकर्म ई. ज्ञान घेऊन व त्यानंतर कर्मफळाप्रती अनासक्त होऊन कर्म करणे हे सगळॆ ऐकून अर्जुनाने एक अतिशय स्वाभाविक असा प्रश्न भगवंतासमोर उपस्थित केला. अर्जुन म्हणाला: हे कृष्ण तुम्ही आधी कर्मसंन्यास आणि नंतर कर्मयोग दोन्हीची स्तुती करत आहात. त्यामुळे मी भ्रमित झालो आहे. आता कृपया तुम्हीच मला निश्चितपणे सांगा कि माझ्यासाठी ( वाचकांसाठी ) नेमके काय कल्याणकारक ठरेल.
भगवंत म्हणाले: हे अर्जुन कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्ही मानवासाठी परम कल्याणकारी आहेत आणि त्यापैकी साध्य करण्यास सहज असल्याने कर्मयोग श्रेष्ठ आहे. काही लोक कर्मसंन्यास आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फळ देणारे समजतात आणि असे लोक ज्ञानी नसून अज्ञानी आहेत. कारण कर्मसंन्यास आणि कर्मयोग दोन्हीपैकी कोणताही एक मार्ग निवडून व्यक्ती आत्मसाक्षात्कारास प्राप्त होऊ शकते. ज्ञानयोगी जण जी परमशांती प्राप्त होते तीच कर्मयोगी व्यक्तींनाही प्राप्त होते. आणि म्हणूनच जो व्यक्ती ज्ञानयोग्य आणि कर्मयोग दोनींनाही एकसमान नजरेने पाहत असतो तोच खऱ्या अर्थाने पाहत असतो. बाकी अज्ञान आहे.
भगवंत भक्ती मध्ये युक्त न होता केवळ कर्मत्याग केला तर तो दुःखाचे कारण ठरतो व अश्या व्यक्तीची प्रगती होत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विनाविलंब आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून परंब्रम्हाची प्राप्ती करतो.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 21) ज्ञानाचे महत्व आणि अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा
भाग 23) सांख्ययोगी आणि कर्मयोगी व्यक्तीची लक्षणे आणि त्यांची महिमा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा