23) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सांख्ययोगी आणि कर्मयोगी व्यक्तीची लक्षणे आणि त्यांची महिमा



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


23) सांख्ययोगी आणि कर्मयोगी व्यक्तीची लक्षणे आणि त्यांची महिमा

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् ।
पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपंश्वसन् ॥८॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥९॥

या भागात भगवंत पुढे सांगतात कि, भक्तीमध्ये मग्न असणारा पवित्र आत्मा आहे. तो आपले मन आणि इंद्रिये संयमित करतो. असा मनुष्य सर्वानांच प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा प्रवित्र व योगयुक्त व्यक्ती कर्म करत असला तरी कधी कर्म बंधनात अडकत नाही. सदैव भगवतभक्ती मध्ये लिन असलेला व्यक्ती विविध कर्मे करतांना दिसत असला, जसे कि ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, झोपतांना, श्वसन करतांना, बोलतांना, उत्सर्जन करतांना, स्वीकार करतांना, किंवा डोळ्यांची उघडझाप करतांना तो जाणतो कि तो काहीच करत नाही. केवळ भौतिक इंद्रिय आपापले कार्य करत आहेत आणि तो स्वतः या विषयापासून अलिप्त आहे.
भौतिक इंद्रिय आपापले कार्य करत आहेत हा भाग समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्थळ, काळ, वय, सवय, मनस्थिती व परिस्थिती यांच्या प्रेरणेने विविध इंद्रिय आपले कार्य करत असतात. याचा अनुभव आपण नित्य घेत असतो जसे कि आपली भोजन करण्याची इच्छा. स्थळ, काळ, वय, सवय, मनस्थिती व परिस्थिती याद्वारे आपण वेगवेगळे प्रतिसाद देत असतो. तसेच विविध मनुष्य सामान स्थळ, काळ, वय, मनस्थिती व परिस्थिती मध्ये सामान प्रतिसाद देताना आढळून येतात. सकाळी सकाळी अधिक झोप घेणे किंवा लवकर उठणे. परीक्षा असताना अधिक स्वयंशिस्त बाळगणे व इतर वेळी निवांतपणा ई. उदाहरणातून आपण हे समजून शकतो कि बहुतांश कार्य हे इंद्रिय करत असतात आणि चेतना हि त्यापासून अलिप्त असते


ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥

कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये ॥११॥

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् । 
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥१२॥

कर्मयोगी पुरुष, सर्व कर्म आणि कर्मफळांना भगवंतास अर्पण करून, आसक्ती रहित कार्य करतो. आणि जसे कि कमल पाण्यात राहून देखील त्यात गुंतत नाही तसेच कर्मयोगी ना ना तर्हेचे कर्म करून देखील त्यास त्या कर्माचे पाप लागत नाही किंवा पुण्यही मिळत नाही. तो कर्म करूनही कर्म बंधनातून मुक्त राहतो. योगी व्यक्ती कोणतीही आसक्ती न ठेवता मन, बुद्धी आणि इंद्रियांनीसुद्धा केवळ आत्मशुद्धीसाठी कार्य करतात.
भगवंत पुढे मार्गदर्शन करतात कि निश्चल भक्त चिरशांती प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पित करतो. परंतु जो भगवंताशी समर्पण भावाने जोडला गेलेला नाही, असा कर्मफळाचा लोभी व्यक्ती कर्म बंधनात अडकतो.
इथे कर्मबंधनाचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा कुणीही मनुष्य एखादे कर्म मी केले असे मानतो तेव्हा त्या कर्माची विविध फळे व त्यांचे परिणाम पाहूया. अतिशीघ्र यश मिळाल्यास अहंकार उत्पन्न होतो किंवा मनुष्य कधीही न संपणाऱ्या आणखी ज्यास्त करूया / मिळवूया या भावात अडकतो. यश मिळण्यास विलंब झाला तर वैताग येतो. अपयश आले तर मन खिन्न होते. परिस्थिती किंवा कर्मफळ मनाविरुद्ध आले तर क्रोध उत्पन्न होतो. कर्म करताना आळस आला तर नंतर त्याची परिणीती पश्चातापात होते.


सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी । 
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥१३॥ 

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः । 
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥१४॥

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः । 
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥१५॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । 
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥१६॥

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः । 
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥१७॥

जेव्हा देहधारी मनुष्य आपली प्रकृती म्हणजेच इंद्रिय संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तोच या नऊ द्वार असलेल्या शरीरात समाधानाने राहताना न तर स्वतःला कर्ता समजतो न हि स्वतःला करविता समजतो. देहधारी मनुष्य कोणत्याही प्रकारे कर्माची निर्मिती करत नाही किंवा लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त सुद्धा करत नाही. जे काही कार्य होत असतात ते केवळ प्रकृतीच्या तीन गुणद्वारा केले जातात. तसेच हेही लक्षात घेणे आवश्यक आहे कि परमेश्वर कुणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाहीत ४:१३ मध्ये सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. पण अज्ञानाने ज्यांच्या ज्ञानावर पडदा टाकला आहे असे लोक हे जाणत नाहीत. जसे सूर्य दिवसा सर्व वस्तुंना प्रकाशित करून दृश्य करतो तसेच अज्ञानाचा नाश झाल्यावरच ज्ञानाने व्यक्ती प्रबुद्ध ( चैतन्यपूर्ण / जागृत ) होतो. जेव्हा मनुष्य बुद्धी, मन आणि निष्ठा द्वारे केवळ परमेश्वरावर आश्रित होतो आणि भगवंत भक्तीत स्थिर होतो तेव्हा ज्ञानाद्वारे त्याचे सर्व कल्मष ( पाप ) धुतले जातात आणि असा मनुष्य मनःस्वास्थ, मनशांती युक्त प्रगती करतो.

।।जय श्री कृष्णा।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने

भाग 22)


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ