25) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ६- आत्मसंयमयोग प्रारंभ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
25) अध्याय ६
अथ षष्ठोऽध्यायः- आत्मसंयमयोग
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥१॥
यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥२॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥३॥
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढ़स्तदोच्यते ॥४।।
६ व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत पुन्हा आठवण करून देतात कि, जो व्यक्ती केवळ अग्निहोत्र आदी कर्म करणारा किंवा याविरुद्ध आपले कर्तव्यही न करणारा अशी व्यक्ती न तर संन्याशी आहे न हि योगी आहे. खरा योगी तोच जो कर्मफलांचा त्याग करून आपले कर्तव्य करत राहतो. हे पांडुपुत्रा ज्याला सन्यास म्हणतात तोच खरा योगी आहे. आणि जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. म्हणजेच मनःस्वास्थ, मनशांती सह प्रगती करू शकत नाही. जो योगसाधनेमध्ये नवीन आहे त्याच्यासाठी कर्म हेच साधन आहे आणि कर्मफळाचा त्याग करणेच योग्य आहे. आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी भौतिक क्रियांचे शमन हेच साधन असल्याचे. आणि जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो व इंद्रियतृप्तीसाठी किंवा ध्येय प्राप्तीसाठी ( सकाम ) कर्मात प्रवृत्त होत नाही तेंव्हाच त्याला योगी म्हणतात.
उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥५॥
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥६॥
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥७॥
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः ॥८॥
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥९॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥
आता मनावर नियंत्रणाची महत्तता भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता मनाला नियंत्रित करून स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हा बद्धजीवांचा मित्र आणि शत्रू दोन्हीही आहे. ज्याने मनाला जिकंले आहे त्याच्यासाठी मन हा त्याच सर्वोत्तम मित्र आहे, आणि ज्याने मनाला वश केले नाही त्यासाठी मन हा कायम परमशत्रू आहे.
ज्याने मन जिंकले आहे त्यातला परमात्मा व परम शांती प्राप्त झालेली असतो. आणि अश्या मनुष्यासाठी सगळे द्वंद् नष्ट होतात. त्याला सुख-दुःख, शीत-उष्ण, मान-अपमान हे सर्व काही सारखेच आहे. मनुष्य जेव्हा प्राप्त केलेल्या ज्ञान आणि साक्षात्कारात पूर्णपणे तृप्त होतो. तो योगी आत्मसाक्षात्कारात स्थित झाला असे म्हणतात. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. त्याच्यासाठी गारा, दगड, सोने ई. सर्व जाही तो समदृष्टीने पाहतो. जो मनुष्य मित्र, शत्रू, मध्यस्थ, तटस्थ, द्वेष करणारा, हितचिंतक, पापी किंवा पुण्य कर्म करणारा अश्या विविध प्रकारच्या व्यक्तींकडे समभावाने पाहतो, तोच अधिक प्रगत आणि विशेष मनाला जातो. आणि असे साध्य करण्यासाठी योगी व्यक्तीने आपले तन, मन आणि आत्मा भगवंत ठायी समर्पित करावे. त्याने एकांत स्थानी राहून काळजीपूर्वक मनाला संयमित करावे. आणि असे करताना त्याने कोणतीही आशा किंवा स्वामित्व भाव ठेऊ नये.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 24) या जगात सुखी राहण्याचा मंत्र समजून घेऊया

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा