45) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले (भाग 2)




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

45) विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले (भाग 2)

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि
व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं
लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन ॥ ११-२० ॥

अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः 
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥ ११-२१ ॥

रुद्रादित्या वसवो ये च साध्या 
विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च । 
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
 वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ ११-२२ ॥


हे भगवंत, तिन्ही लोकांमधील आकाश आणि सर्व दिशा तुमच्या या विराट रूपाद्वारे तुम्ही व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून सर्व ग्रहलोक अत्यंत भयभीत झाले आहेत.  देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि त्यापैकी काही देवता भयभीत होऊन हात जोडून आपल्याला नमन करत  प्रणाम आहेत. 

तसेच महर्षीगण व सिद्धगण  समुदाय, सर्वांचे  कल्याण होवो कल्याण होवो, अशी प्रार्थना करत, वेदातील मंत्रोच्चार करून आपली स्तुती करीत आहेत. 

यसोबतच सर्व रुद्रगण, बारा आदित्य तसेच आठ वसू, सिद्धगण, विश्वदेव, दोन्ही अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितृगण, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचेगण आहेत, ते सर्वच विस्मयभावाने आपल्याकडे पाहात आहेत. ॥ ११-२२ ॥


रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं 
महाबाहो बहुबाहूरुपादम् । 
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा 
लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥ ११-२३ ॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
 व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । 
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा 
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ ११-२४ ॥

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि 
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । 
दिशो न जाने न लभे च शर्म 
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ११-२५ ॥


हे महाबाहो मी, देवता तसेच सर्व जण तुमचे हे अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि
अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे रूप पाहून सर्व लोक व्याकूळ होत आहेत. हे विष्णो, आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली विक्राळ तोंडे व तेजस्वी विशाल डोळे पाहून माझे अंतःकरण भयभीत झाले आहे. माझे धैर्य खचले आहे व मानसिक संतुलन राखण्यास मी असमर्थ आहे. हे अधिदेव, हे जगन्निवास, तुमच्या भयानक दाढांमुळे  व मृत्यूसम अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला संतुलन राखणे अशक्य झाले आहे. 

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
 सर्वे सहैवावनिपालसङ्घैः । 
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ 
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ ११-२६ ॥

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति 
दंष्ट्राकरालानि भयानकानि । 
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु 
संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ ११-२७ ॥

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः 
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
 तथा तवामी नरलोकवीरा
 विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ ११-२८ ॥

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा 
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । 
तथैव नाशाय विशन्ति लोका:
तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ ११-२९ ॥

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ता 
ल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः । 
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं 
भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ११-३० ॥

भगवंताचे आक्राळविक्राळ विराट रूप पाहिल्यावर अर्जुन भगवंतांनी सांगिल्याप्रमाणे भविष्यातील घटना आता पाहत आहे आणि यात अर्जुन काय पाहतो तर  धृतराष्ट्राचे सर्व पुत्र त्यांच्या समर्थक राजसमुदायासह परमेश्वराच्या विक्राळ मुखात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य
कर्ण सुद्धा यात सामील आहेत आणि आमच्या ( पांडवांच्या)  बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात ( मृत्युमुखात) वेगाने प्रवेश करत आहेत आणि त्यांच्यापैकी काही जणांची  डोकी परमेश्वराच्या दाढेत चिरडली जात आहेत. ज्याप्रमाणे महान  नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत. जसे पतंग नष्ट होण्यासाठीच पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व योध्ये स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात वेगाने प्रवेश करीत आहेत. 
आणि हे विष्णो तुम्ही तुमच्या विशाल प्रज्वलित मुखांनी या सर्वाना गिळत आहात. तुम्ही आपल्या प्रखर प्रकाशाने सर्व जगाला तेजाने व्यापून तापवीत आहात

आख्याहि मे को भवानुग्ररूपो 
नमोऽस्तु ते देववर प्रसीद । 
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं 
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌ ॥ ११-३१ ॥

हे देवाधिदेव कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. आणि कृपया मला सांगा कि हे विशाल आणि उग्र रूप धारण केलेले तुम्ही कोण आहात? माझा प्रणाम स्वीकार करा आणि माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्हीच आदिपुरुष आहात, मला तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे कारण मी तुमचे प्रयोजन जाणत नाही.

वरील भागात अर्जुन ( वाचक ) भगवंताची दुसरी बाजून प्रथमच बघतो आणि भ्रमित होतो. आतापर्यंत परमेश्वर म्हणजे सुंदर, प्रसन्नचित्त, जगाचा पालनकर्ता अश्या स्वरूपात भगवंताची कल्पना करणाऱ्या भक्तांसाठी हे आक्राळविक्राळ विराट विश्वरूप म्हणजेच एक समजण्यापलीकडील कोडे अणे आणि अर्जुनाने केलेल्या प्रश्नामुळे वाचकांनां सुद्धा त्यांच्या मनातील शंकांचे उत्तर आता पुढील भागात मिळणार आहे.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 45) विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ