46) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताच्या दर्शनातून अर्जुनाला मिळालेले ज्ञान
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
46) भगवंताच्या दर्शनातून अर्जुनाला मिळालेले ज्ञान
श्रीभगवानुवाच;
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ११-३२ ॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ११-३३ ॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं
तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ११-३४ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा महाकाल मी आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी इथे प्रकट झालो आहे. माझ्या योजने नुसार या सैन्यात दोहोबाजूचे जे योद्धे आहेत, ते सर्व ( तुझ्याशिवाय / पांडवांशिवाय) राहणार नाहीत. म्हणजेच हे अर्जुना तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. म्हणूनच तू ऊठ. युद्ध कर आणि यश मिळव. शत्रूंना जिंकून संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर माझ्याकडून आधीच मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची, तू फक्त निमित्तमात्र होशील.
द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे इतर अनेक योध्ये याआधीच माझ्याकडून मारले गेले आहेत म्हणून तू व्यथित न होता त्यांचा वध कर, आणि त्याद्वारे या युद्धात विजय मिळवं.
संजय उवाच;
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ११-३५ ॥
संजय म्हणाला, भगवान कृष्णाचे हे बोलणे ऐकून किरीटी (अर्जुनाने) हात जोडून थरथर कापत भगवंताला नमस्कार केला आणि अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित स्वरात म्हणाला
अर्जुन उवाच;
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः ॥ ११-३६ ॥
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ११-३७ ॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य
विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ११-३८ ॥
अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी हृषीकेश, आपले नाव, गुण श्रवण केल्याने जग अतिशय उल्हसित होत आहे व सर्वजण तुमच्यावर प्रेम करू लागत आहेत. तसेच राक्षसगण भिऊन दिशादिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करत आहे आणि हे जे काही घडत आहे ते योग्यच आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवही तुमच्यापासून उत्पन्न झालेले आहेत आणि तुम्ही त्याहूनही श्रेष्ठ आहात.
अशा आपल्याला, परमेश्वराला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, जे सत, असत या दोहोंच्या पलीकडील अक्षर, सर्व कारणाचे कारण तुम्हीच आहात.
आपण आदिदेव सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे एकमेव सर्वोत्तम असे आश्रयस्थान आहात. तुम्हीच सर्वज्ञ आहात आणि तुम्हीच जाणण्या योग्य आहात. तुम्ही तिन्ही गुणांचे कारण असलेले गुणातीत आहात आणि हे अंत नसलेल्या रूपाने तुम्हीच हि सृष्टी व्यापली आहे.
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ११-३९ ॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते न
मोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ११-४० ॥
या भागात अर्जुन भगवांच्या दर्शनातून त्यांना लाभलेले आणखी ज्ञान सांगत आहे, अर्जुन म्हणाला, हे भगवंत तुम्हीच वायू, परम नियंता यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी प्रजापती ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. तुम्हाला हजार वेळा नमस्कार नमस्कार असो. आपणाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
हे अपार सामर्थ्यशाली भगवंत तुम्हाला पुढून व मागूनही नमस्कार, तुम्हाला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. तुम्ही सर्व जग व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरूप म्हणजेच सर्व काही तुम्हीच आहात.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 45) विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनाने काय काय पाहिले (भाग 2)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा