47) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताचे विराट रूप पाहण्यासाठी पात्रता
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
47) भगवंताचे विराट रूप पाहण्यासाठी पात्रता
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ११-४१ ॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ११-४२ ॥
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥ ११-४३ ॥
तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ११-४४ ॥
भगवंताचे विराट रूप पाहिल्यावर अर्जुनाला भगवंतासोबत आपण केलेल्या आचरणाची आठवण झाली आणि अर्जुनाने क्षमा याचना कार्य;या सुरुवात केली.
अर्जुन म्हणाला, हे भगवंत तुमचणे दिव्या स्वरूप न जाणवल्यामुळे, मी तुम्हाला कधी मित्र मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे
कृष्णा, हे यादवा, हे सख्या, आणि हे अच्युता असे जे एकेरी भाष्य केले, अनादराने बोललो, मित्रा प्रमाणे किंवा थट्टास्वरूपात, फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि एकत्र भोजन इत्यादी करताना, एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची मी आपणाकडे क्षमा मागतो.
हे अच्युत सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा. आपण या संपूर्ण चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक गुरू आहात. हे
अतुलनीय भगवंत, तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. मग तिन्ही लोकांमध्ये आपल्याहून श्रेष्ठ कोण कसा असू शकेल? तुम्हीच सर्व जीवांचे आराध्य परम परमेश्वर आहात. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करून तुमच्या कृपाप्रसादासाठी प्रार्थना करीत आहे. हे भगवंत, जसे एक पिता पुत्राचे, मित्र जसे मित्राचा आणि पत्नी ज्या पद्धतीने प्रिय पतीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करून मला क्षमादान द्या.
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देवरूपं
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ११-४५ ॥
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि
त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ११-४६ ॥
परमेश्वर स्वरूपाची जाण आणि आपल्या अजाणतेपणाची क्षमा मागितल्यावर मोहित झालेला अर्जुन परमेश्वराला पुढे विनंती करतो,
हे परमेश्वर, पूर्वी कधीही न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो असलो तरी माझे मन भीतीने
अतिशय व्याकूळ सुद्धा झाले आहे आणि म्हणूनच मी आपणास विनंती करतो कि आपण मला ते चतुर्भुज विष्णुरूपच दाखवा.
हे देवेश, हे जगन्निवास, प्रसन्न व्हा. हे सहस्त्रबाहो तुमचे मुकुट धारण केलेले तसेच गदा, शंख, पद्म आणि चक्र हातात घेतलेले तुमचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे.
श्रीभगवानुवाच;
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ११-४७ ॥
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न
च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवंरूपः शक्य अहं नृलोके
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ११-४८ ॥
मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ११-४९ ॥
अर्जुनाची हि विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी मी माझ्या योगशक्तीच्या प्रभावाने
हे माझे परम तेजोमय, आद्य, अनंत, विराट विश्वरूप रूप तुला दाखविले. या जगतात ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते.
भगवंत पुढे विराट रूप दर्शनाची सिद्धी किती दुर्लभ आहे ते सांगतात. भगवंत म्हणाले, हे कुरुप्रवीर, मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी स्वरूपात मला यापूर्वी कुणीही पहिल नाही कारण वेदांच्या अध्ययनाने आणि यज्ञाने, दानाने, वैदिक पुण्य कर्मांनी आणि उग्र ( कठीण ) तपश्चर्यांनीही मला या रूपात पाहणे शक्य नाही.
माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू विचलित होऊ नकोस किंवा भ्रमीतही होऊ नकोस. हे रूप आता मी समाप्त करतो आणि तुझ्या इच्छेप्रमाणे माझे हे शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप प्रकट करतो जेणेकरून तू प्रसन्न व शांतचित्ताने माझे चतुर्भुज रूप पाहू शकशील.
सञ्जय उवाच;
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ११-५० ॥
अर्जुन उवाच;
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥ ११-५१ ॥
संजय म्हणाले, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि नंतर आपले श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. आणि हे सौम्यरूप पाहून अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत सुंदर मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या पूर्वस्थितीला प्राप्त झालो आहे.
श्रीभगवानुवाच;
सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥ ११-५२ ॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ११-५३ ॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे जे विराट रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे.
देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनासाठी संधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. माझ्याद्वारे प्राप्त दिव्यदृष्टीने तू जे माझ्या ज्या चतुर्भुज स्वरूपाचे रूपाचे दर्शन घेतले ते देखील विराट स्वरूपासारखे ( ।। श्लोक ११. ।। ) वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. परंतु हे परंतप अर्जुना,
तुज्यासारखेच केवळ अनन्य भक्तीनेच माझ्या या प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, जाणणे व माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे.
भगवंतप्राप्ती किती अवघड आणि किती सहजसुलभ आहे हे भगवंतनी वरील श्लोकांमध्ये सांगितले. याच श्रद्धेमुळे दैत्यांमध्ये प्रल्हाद मीच आहे असे भगवंत याआधी म्हणालेले आहेत. ( श्लोक ।।१०.।।)
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः ।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ११-५५ ॥
श्रीभगवान म्हणाले; हे पांडव, माझे कर्म करण्यामध्ये संलग्न असलेला, मलाच परम श्रेष्ठ परमेश्वर मानून केवळ माझीच अण्णांनी भक्ती करणारा पुरुष. जो कि सर्व प्रकारची सकाम कर्में आणि बौद्धिक तर्कवितर्क सोडून केवळ माझ्यासाठीच कार्य करतो. जो सर्व प्राणीमात्रासाठी मित्रवत असतो. आणि मलाच जीवनाचे परम लक्ष मानतो असा विशुद्ध भक्त मला निश्चितपणे प्राप्त होतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 46) भगवंताच्या दर्शनातून अर्जुनाला मिळालेले ज्ञान

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा