1) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात - मनोगत




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात -राजेश्वरी


1)- मनोगत

मागील दोन तीन वर्षात जादू होत आहे, बहुतेक वेळा टीव्ही क्रिकेट बातम्या यातच व्यस्त राहणारा, छोट्या छोट्या मुद्द्यांवर राग-राग करणारा माझा बाबा बदलत आहे. भरपूर राग असणारा शीघ्रकोपी माझा बाबा आता बहुतेक वेळा शांत असतो, न तो माझ्यावर राग राग करतो, न चुका काढतो, न हि तो आम्हाला ज्यास्त ज्ञान देतो. अतिशय शांत व संयमी हा माझा बाबा जणू काही एक नवीन व्यक्ती आहे, पुनर्जन्म झाल्यासारखा.

आता आम्ही खुश असतो, आधी बाबा घरी असला कि एक तणाव असायचा जणू काही संचारबंदी लागू आहे. आतामात्र बाबा आहे तिथे आश्वासक भाव आहे, विश्वास आहे आणि स्वीकार आहे. आता मला चुकायची भीती वाटत नाही, आता मला एक वेगळा विश्वास प्राप्त झाला आहे आणि माझ्यामध्ये एक नवी साकारात्कमकता आली आहे.

या स्वागतार्ह बदलाबाबत माझ्या मनात एकच प्रश्न होता. हो तोच आपला CID वाला ... आठवला का ? हो तोच... कूछ तो गडबड है दया! मग काय मी बाबा सोबत ज्यास्त वेळ राहायला लागले आणि माझा शोध सुरु झाला.मला समजून घ्यायचं होत कि नेमकं काय चाललयं? हा कश्याचा प्रभाव आहे? हळू हळू बाबा सोबत गप्पा व्हायला लागल्या, गप्पांच रूपांतर चर्चेमध्ये होऊ लागलं आणि आणि मला एक एक प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. आणि हो एक वेगळीच गोडी लागली, मित्र, टीव्ही, मोबाईल मागे पडू लागले आणि शक्य तितका वेळ बाबा सोबत घालवायला लागले.आतापर्यत मला एक कळलं होत कि भगवान कृष्ण आणि भगवद्गीता याचाच हा परिणाम आहे, बाबा रोज भगवद्गीता वाचतो आणि आचरणात आणायचं प्रयत्न करतो. मग सुरु झाला प्रवास भगवद्गीता समजून घेण्याचा. दिनांक २२ फेब्रुवारी २०२० ला मी प्रकृतीचे तीन गुण या विषयावर बाबांचं विवेचन ऐकलं आणि मग स्वतःला बदलायचा प्रयत्न सुरु केला. परिणाम सकाळी ८ ला उगवणारा माझा सूर्य लवकर उगवून दिवस ब्रम्हमुहूर्तावर सुरु होऊ लागला.

मग आणखी एक चमत्कार झाला कोविड १९ मुळे घरातच राहायची वेळ. संकट समयी बाबाची सकारात्मकता अनेकांना उपयुक्त वाटू लागली आणि मग स्नेहल मांडवकर मॅडम, झितल शाह मॅडम, रतिश सर, दातार सर अश्या काही जवळच्या व्यक्तींना सोबत घेऊन भगवद्गीता प्रवचन सुरु झाले. रोज नवा विषय रोज नवी माहिती. तीही जीवन बदलवून टाकणारी आणि नावही तसेच दिले गेले. “मेरी भगवद्गीता आज के संदर्भ मे” श्रवण करता करता मी रोज मला काय कळले ते टिपून ठेवत होते व आजच्या काळातील हि सहज सुलभ गीता बाबाला आवडली आणि बाबाने मला ती तुम्हा सर्वांसमोर आणण्याची प्रेरणा दिली.

भग्वद्गीतेवर टिपणी करण्यासाठी मी कदाचित खूप लहान आहे, अज्ञानी आहे आणि गीता या विषयावर भाष्य करण्याची माझी पात्रता सुद्धा नाहीये, पण या ज्ञानाचा जसा मला व माझ्या सारख्या अनेक जणांना ज़ो फायदा होत आहे तो बघता मला वाटते कि भगवदगीता आज च्या संदर्भात हे विवेचन लिहिणे माझे परम कर्तव्य आहे. यंदा माझं १०वी च वर्ष असल्यामुळे अभ्यास व भगवदगीता असा दुहेरी प्रवास सुरु आहे आणि भगवान कृष्ण कृपेने आणि बाबा च्या मार्गदर्शनामुळे दोन्हीही सुरळीत चालू आहे. भगवद्गीते मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपले नियत कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये आणि प्राप्त फळावर अधिकार हि सांगू नये. काय ते मायबाप वाचक ठरवतील त्याच स्वीकार करून ते श्रीकृष्ण चरणी अर्पण करावे हा मानस आहे. पहिल्या प्रयत्नात उत्तम अशी भगवद्गीता टिपण्णी लिहिण्याचा माझा अट्टाहास सुद्धा नाही. त्याची मला अपेक्षा सुद्धा नाही. काळाच्या ओघात माझ्या लेखणीतून नक्कीच एक आजच्या समाजाला उपयोगी अशी टिप्पणी आपल्या समोर येईल हा माझा आशावाद आहे. तरी चूक भूल माफी असावी, मोठ्या मानाने मला आपल्या सर्व वाचकाचे मार्गदर्शन मिळावे हिच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करून मी लिहावयास सुरुवात करत आहे.

विशेष धन्यवाद, माझे प्रेरणास्थान, माझी आई सुजाता राजेश्वर चान्ने.

माझी मार्गदर्शक आजी साधना एकनाथराव चान्ने. माझी अनुजा अनुष्का चान्ने जिच्यासोबत हसत खेळत मी गीता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

माझा बाबा ज्यांनी मला विश्वास दिला कि प्रयत्नपूर्वक मी हे शिवधनुष्य पेलू शकेल.

खरे पाहता हे पुस्तक म्हणजे बाबाच्या प्रवचन ऐकून मी माझ्या समजेनुसार माझ्या शब्दात केलेला अनुवाद आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही, शब्द हि त्यांचेच, भाव हि त्याचाच, भावार्थ हि त्याचा आणि मी हि त्याचीच शिष्य त्यामुळे आदरणीय गुरुवर्य माझे बाबा श्री राजेश्वर एकनाथराव चान्ने यांनाच माझ्या प्रत्येक शब्दांचा धनी मानून मी हे पुस्तक “माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात "राजेश्वरी" नामे अर्पण करत आहे.

|| जय श्रीकृष्ण ||

धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने.


भाग दोन-
मांडणी, अभ्यासाची गरज आणि पात्रता:- http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post.html

#BHAGAVAD-GITA, #BHAGAVADGITA, #माझी_भगवद्गीता_आजच्या_संदर्भात, #मनोगत, #माझी_भगवद्गीता , #राजेश्वरी,

टिप्पण्या

  1. अप्रतिम. खूप छान शब्द मांडणी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान, निशा बेटा, शुभाशिर्वाद,🙌

    उत्तर द्याहटवा
  3. Khup chan Nisha.. Amhi tuza pudhchya blog vachayala utsuk ahot..
    All the best..
    Jai Shree Krishna

    उत्तर द्याहटवा
  4. Hyatin amhala khoop bodh milnar ahe tyamule ami pudhil blog sathi ustuk ahot . khoop chan Nisha

    उत्तर द्याहटवा
  5. खुप सुंदर लिहिलंय निशा. आता पुढे काय???. म्हणुन वाचायला मन अधीर झालंय. THANK YOU SO MUCH. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  6. ખૂબ જ સરળ અને અસરકારક રીતે રજૂઆત કરવામાં આવી છે

    उत्तर द्याहटवा
  7. Fantastic Nisha!!
    Many congratulations to you and best wishes for your wonderful journey.
    आपका आपके पिताके प्रति समर्पक भाव भा घ्या.

    उत्तर द्याहटवा
  8. जय श्री कृष्णा 🙏
    निशा बेटा
    अप्रतिम शब्द मांडणी व भाव खूप छान रेखाटले आहेत
    तुझ्या असाधारण अशा प्रवासाला अनंत अनंत शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  9. Khup chan lihalay nisha mi pudhacha bhag yenachi vat pahat ahe jay shree krishana

    उत्तर द्याहटवा
  10. झंकास निशा बेटा ... अप्रतिम सुरुवात केली आहे ..खूप खूप शुभेच्छा .
    || जय श्रीकृष्णा ||

    उत्तर द्याहटवा
  11. खूपच सुंदर लिखाण, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभ आशिर्वाद

    उत्तर द्याहटवा
  12. सहज व सोप्या भाषेत छान लिहिले आहे. उत्तम प्रयत्न 👍👍🙏

    उत्तर द्याहटवा
  13. mi ek website developer ahe mi aapla ha blog well design create krun deu shakto.
    aapli ichaa asel tr contact kru shakta : kupatil122@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  14. निशा बेटा ज्या प्रकारे तू हे शिवधनुष्य पेलले आहेस .. खरोखरचं कौतुकास्पद आहे 🙏 तुझ्या बाबांचा भगवद्गीतेचा गाढा अभ्यास आहे .. आणि तुम्ही भगवदगीता लिहिता त्याबरोबर जगता ही ... भावी ब्लॉग साठी खुप खूप शुभेच्छा 💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ