12) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये





माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

12) स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये


अर्जुन उवाच:

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥२.५४॥

अर्जुन म्हणाला: हे कृष्ण ज्याची भावना समाधिस्त झाली आहे त्या व्यक्तीला कसे ओळखावे, त्याची लक्षणे कोणती आहेत?, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? त्याचे वर्तन बसणे चालणे कसे आहे?

श्रीभगवानुवाच:

प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मयेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥२.५५॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥२.५६॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२.५७॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गनीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२.५८॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्टवा निवर्तते ॥२.५९॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२.६०॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥२.६१॥

यावर भगवंत म्हणाले, हे पार्थ मनात चाललेल्या विचारामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या इच्छा आणि आसक्तींचा त्याग करून जो मनुष्य अत्यंत शुद्ध मनाने आपले मन आत्म्यामध्येच स्थिर करतो तेव्हा त्या व्यक्तीला विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झालेला किंवा स्थितप्रज्ञ म्हंटले जाते.

जो दुखदायी प्रसंगात दुःखी होत नाही किंवा सुखकारक घटनांमुळे हर्ष करत नाही. जो आसक्ती, इच्छा, भय क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी म्हणता येईल. या भौतिक जगात जो शुभ किंवा अशुभ गोष्टीनी प्रभावित होत नाही शुभाची स्तुतीही नाही आणि अशुभाची निंदाही नाही तो ज्ञानी व्यक्ती स्थिर बुद्धी आहे असे समजावे.
ज्या प्रमाणे कासव आपले अवयव कवचामध्ये ओढून घेतो त्याप्रमाणेच जो व्यक्ती आपल्या इंद्रियांना व त्यापासून निर्माण होणाऱ्या इच्छाना आवरून घेऊन पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो.
इथे हा प्रश्न निर्माण होतो कि मनुष्य म्हंटले कि इंद्रिय विषय व त्यापासून निर्माण होणाऱ्या इच्छा व त्या इच्छा प्रति आसक्ती हि आलीच. पण आपण जर

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।२:१३। 
व 
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ।२:१४।

याचा संदर्भ घेतला तर हे समजून येईल कि सुख दुःख आणि शुभ अशुभ तसेच जीवन प्रवास हा अतिशय नियमीत व अटळ असा आहे आणि हे परम सत्य जाणून जो व्यक्ती स्वतः या घटना व घटनांमधून होणाऱ्या भवनाच्या व्यायसायात भाग ना घेता तटस्थ राहतो त्यालाच स्तिथप्रदया किंवा स्थिर बुद्धी मुनी म्हंटले आहे.
बोलणे सोपे व करणे अवघड या उक्तीप्रमाणे भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणजे वाचकांना लगेचच सावधान करतात कि जरी मनुष्य इंद्रियभोगापासून निवृत्त जाहला तरी त्याला इंद्रियविषयाची गोडी हि राहतेच आणि जोपर्यंत मनुष्य भगवंत भक्तीमधील परमानंद रुपी अतिउत्तम रस स्वाद घेत नाही तोपर्यंत तो हि प्रबळ इंद्रिय विवेकी मनुष्याला वारंवार इंद्रियांच्या जाळ्यात ओढतात जसे काही ती त्या व्यातीला बळजबरीने ओढून नेत आहेत. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि जो व्यक्ती भगवंत भक्तीमधील परमानंद रुपी अतिउत्तम रस घेतो तो चेतनेमध्ये तोच स्थिर होतो.

ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते । 
संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥2.62॥

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । 
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥2.63॥

इथे भगवंत इंद्रिय आणि इंद्रयतृप्तीची इच्छा याचे चक्रव्यूह कसे काम करते हे अतिशय सुलभपणे सांगताना दिसतात. प्रत्यक्ष व्यक्तीने हे चक्रव्यूह नीटपणे समजावून घेणे आणि त्यानुसार स्वतःला संयमीत करणे आवश्यक आहे. आत हे चक्रव्यूह नीटपणे समजून घेण्याचा प्रयत करूया
इंद्रिय - इंद्रिय विषय - चिंतन - इच्छा ( आसक्ती ) - काम - क्रोध - संमोह - स्मृतिभ्रम - बुद्धीनाश - अधपतन.  म्हणजेच काय इंद्रिय विषयाचे चिंतन किंवा ध्यास हीच अधपतानाची पहिली पायरी आहे आणि जर मनुष्याने मन आणि चेतना स्थिर ठेवून वेळीच पुढील परिणामाची जाणीव ठेवून जर मनाला संयमित केले तर अधपतन टाळता येऊ शकते. वाचकांच्या फायद्यासाठी आपण एकदा आणखी सुलभ भाषेत हे चक्रव्यूह समजून घेऊया. 

जेव्हा मनुष्य इंद्रियविषयाचा करतो तेव्हा त्या विचारातून इंद्रिय तृप्तीची भावना अधिक प्रबळ होते आणि यातूनच अधपतानाची वाट कशी धरली जाते ते आपण बघूया. उदाहरण म्हणून आपण जिव्हा किंवा जीभ आणि आवाडीचा पदार्थ खाण्याची इच्छा या बाबत विचार करू, आवडीचा पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि व्यक्ती जर ज्याचं विषयच ध्यास धरू लागला तर नक्कीच हि इच्छा प्रबळ होत जाते आणि जर हि इच्छा पूर्ण जाहली नाही तर त्यातून रागाची ( म्हणजेच क्रोध ) निर्मीती होते आणि या क्रोधापोटी मग मनुष्य अज्ञानी व्यक्तीसारखा वेगवेगळ्या युक्त्या लढवतो आणि नको ते कार्य करून बसतो व अधपतन अटळ.
जेव्हा मनुष्य इंद्रियविषयाचा विचार करतो तेव्हा त्या विचारातून इंद्रिय तृप्तीची भावना अधिक प्रबळ होते आणि यातूनच अधपतानाची वाट कशी धरली जाते ते आपण बघूया. उदाहरण म्हणून आपण जिव्हा किंवा जीभ आणि आवाडीचा पदार्थ खाण्याची इच्छा या बाबत विचार करू, आवडीचा पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि व्यक्ती जर ज्याचं विषयच ध्यास धरू लागला तर नक्कीच हि इच्छा प्रबळ होत जाते आणि जर हि इच्छा पूर्ण जाहली नाही तर त्यातून रंगाची म्हणजेच क्रोधाचा उगम स्वाभाविकच आणि आणि या क्रोधापोटी मग मनुष्य अज्ञानी व्यक्तीसारखा वेगवेगळ्या युक्त्या लढवतो आणि नको ते कार्य करून बसतो व अधपतन अटळ.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । 
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥2.64॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥2.65॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥2.66॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥2.67॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.68॥

म्हणूनच आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि इंद्रियांना नियंत्रित करण्यात समर्थ असणारा व्यक्तीलाच भगवंताची पूर्ण कृपा म्हणजेच मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतिरूपी कृपा प्राप्त होते. आणि अशी आसक्ती- अनासक्तीतुन मुक्त, संतुष्ट व्यक्ती सर्व प्रकारच्या भौतिक, अज्ञात्मिक आणि दैवी त्रासापासून मुक्त होऊन स्थिर बिद्धी म्हणजेच स्थितप्रज्ञ  होतो.
परंतु ज्याच्याकडे दिव्या ज्ञान नाही अश्या व्यक्तिचे मन कधीही स्थिर होत नाही आणि अश्या व्यक्तीला स्थिर मनाअभावी शांती प्राप्त होत नाही आणि शांतीवाचून सुखप्राप्ती म्हणजेच एक दिवास्वप्न बनून राहते. ज्याप्रमाणे वेगवान वारा पाण्यातील नावेला ओढून नेतो त्याप्रमाणेच एक किंवा अनेक इंद्रियांमध्ये मन गुंतलेला मनुष्य नित्य पदभ्रष्ट होऊन भटकत राहतो. म्हणूनच ज्या व्यक्तीची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केली आहेत तोच स्थिर बुद्धी ठरतो. यामुळेच मनुष्याला आपली विविध इंद्रिये ( ज्ञानेंद्रिय-कर्मेंद्रिय. ) संयमित करणे आवश्यक आहे.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥2.69॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं- समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥2.70॥

यासोबतच स्थितप्रज्ञ व्यक्ती किंवा स्थिरबुद्धी मुनी आणि सामान्य मनुष्य यांच्यामधील एक महत्वाचा फरक भगवंतांनी सांगितलं आहे आनंद तो फरक म्हणजे ज्या गोष्टी सामान्य माणसे करत असतात त्यागोष्टी स्थिरबुद्दी मुनी करत नाहीत आणि ज्या गोष्टी सामान्य माणसे करत नाहीत त्या गोष्टी स्थिरबुद्धी मुनी करतात. इथे हा उल्लेख केला आहे कि जेव्हा सर्व मनुष्यांची रात्र असते तेव्हा आत्मसंयमी मनुष्य जागृत असतो आणि जी सर्व जीवांच्या जागृतीची वेळ असते तेव्हा आत्मनिरीक्षक मुनीची रात्र असते.  
याचाच अर्थ असा कि ज्ञानी लोक आपल्या ज्ञानाने जाणतात कि नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करायचे आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. बहुतांश लोक आपल्या इंद्रियतृप्तीसाठी कार्यरत असतात आणि मुनी लोक हे आत्मसाक्षात्कारासाठी कार्यरत असतात. आत्मसंयमी व्यक्ती एखाद्या समुद्राप्रमाणे असतात. ज्यामध्ये अनेकानेक नद्या सतत जल अर्पण करत असतात आहि तरीही समुद्र मात्र स्थिर असतो त्याचप्रमाणे ज्ञानी स्थिरबुद्धी मनुष्य सुद्धा इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या विविध इच्छा प्रकट होत असतांना सुद्धा विचलित होत नाही. आणि म्हणूनच असा व्यक्ती मनशांती प्राप्त करतो आणि जे लोक इंद्रियांद्वारा निर्मित इच्छा पूर्ण करण्यासाठी झगडत असतात त्यांना कधीही शांती प्राप्त होत नाही. 

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ॥2.71॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥2.72॥

दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यात भगवंत जाहीर करतात कि, ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे व इच्छारहित केवळ नियत कर्म करत जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावानेचा त्याग केला आहे. त्याला न तर स्वामित्व भाव आहे, न हि खोटा अहंकार केवळ अशीच व्यक्ती शांती प्राप्त करू शकते. या अध्यायाच्या शेवटी हे जाणून घेणे महत्वाचे आहे कीं मनस्वास्थ, मनःशांती युक्त प्रगती सर्वाधिक महत्वाची आहे. आणि जो व्यक्ती स्थिर बुद्धी असतो आणि तोच अध्यात्मिक आणि दिव्य जीवन जगतो. आणि असा मनुष्य कधीच इंद्रयतृप्तीसाठी मोहित होत नाही. भगवंत हे हि स्पष्ट करतात कि, जीवनात शेवटच्या क्षणीही जर जर कुणी मनुष्य स्थिरबुद्धी झाला तर त्याला लगेचच भगवदधमाची प्राप्ती होते. म्हणजेच आयुष्यात स्थिर बुद्धी  (सुख दुःख, जय परायज, शुभ अशुभ , लाभ हानी हे सार काही सामान मानणारा ) व्यक्तीच परमशांती आणि परमगती प्राप्त करण्यासाठी अति महत्वाचे आहे आणि जीवनात यासाठी प्रयत्न करण्यासाठी कधीही उशीर होत नाही.

इति श्री कृष्ण चरण मास्तु |

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम द्वितीयोऽध्यायः॥2॥


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने

भाग 11)- कर्मयोग काय आहे? याविषयी मार्गदर्शन

भाग 13)- कर्मयोग प्रारंभ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ