5) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- पार्थद्वारे (अर्जुनाद्वारे) सैन्य निरीक्षण आणि संजय द्वारा प्रसंग वर्णन







माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी


5) पार्थद्वारे (अर्जुनाद्वारे) सैन्य निरीक्षण आणि संजय द्वारा प्रसंग वर्णन


अध्याय १ श्लोक २० ते २३ - पार्थद्वारे (अर्जुनाद्वारे) सैन्य निरीक्षण

अर्जुन उवाचः

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १.२०৷৷

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥१.२१৷৷

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितां।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥৷१.२२৷৷

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥৷१.२३৷৷



अध्याय १ श्लोक २४ ते २७-
संजय द्वारा प्रसंग वर्णन

संजय उवाच:

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ৷৷१.२४৷৷

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्उ।
वाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ৷१.२५৷৷

तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।৷१.२६৷৷

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्
॥कृपया परयाविष्टो विषीदत्रिदमब्रवीत् ৷৷१.२७৷৷

पार्थ अर्जुनाद्वारे सैन्य निरीक्षण, हा प्रसंग अत्यंत महत्वपूर्ण आहे, आपल्या आयुष्यात युद्धाला सामोरे जाताना, कठीण समयी किंवा परिक्षेच्या घटकेला सामोरे जाताना, आपण हा प्रसंग लक्षात घेऊन जर आपण कृती केली तर निश्चितच सकारात्मकता वाढून आपण योग्य निरीक्षण करून योग्य निर्णय घेऊ शकू.

या प्रसंगात अर्जुन सर्व योध्यांचे निरीक्षण करत आहे. यात त्याला दोन्ही बाजूला आपलेच लोक दिसत आहे म्हणजेच भावनांचा आवेग वाढला कि मग विवेक मागे पडतो. धर्म व अधर्म, काय करावे व काय करू नये यातील भेद करता येत नाही. अर्जुनाचीही अवस्था काहीशी अशीच झालेली येथे दिसून येत आहे. आधीच सांगितल्या प्रमाणे अर्जुनाला संयम, शक्ती, ध्यान, ज्ञान, संपर्पण या सदगुणाप्रमाणे ( पांडव ),  अहंकार, भ्रम, लाचारी, कपट, मोह, हे दुर्गुणही ( कौरव )  दोन्हीही आपलेच वाटू लागले आहेत आणि त्याची बुद्धी संमोहित झाली आहे. 

वाचक मित्रानो कित्याक वेळा आपण आपलाच आळस, क्रोध, लालसा, मोह, कंटाळा, मत्सर, मनातील भीती, घाबरटपणा या दुर्गुणांना आपलाच मानून त्यांचा त्याग करायला धजावत नाही. अनेक जण तर अक्षरशः या दुर्गुणांना कवटाळून बसलेले असतात आणि मग अश्या व्यक्तींना धर्माचरण म्हणजेच आपले नियत नित्य कर्तव्य कर्म करता येत नाही. अज्ञानामुळे अश्या व्यक्तींना गुरुकृपा सुद्धा लाभत नाही. मग अपयश आणि निराशाच पदरी पडते. व जीवन कळत नकळत दुख्खाचे आगर बनते. त्यामुळेच आपल्याला या मनोभूमीवरील युद्धात कोणते विकार ( सवयी ) आपले व कोणते विरोधी ह्याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आयुष्यात एक कृष्णसखा मार्गदर्शक असावा लागतो. 

अजून गुरुकृपेने ज्ञान प्राप्ती न झाल्यामुळे अर्जुन संमोहित झाला आहे आणि त्यामुळे समोर आलेल्या परिस्थितीचे वर्णन पुढील प्रसंगात करण्यात आले आहे.
 
।। जय श्रीकृष्णा ।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने

भाग 4)- 
दोन्ही बाजूच्या सैन्याचे आणि योध्यांचे वर्णन आणि शंख-ध्वनि वर्णन व त्याचा परिणाम


भाग 6)- अर्जुन विषाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ