6) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अर्जुन विषाद
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेश्वरी
6) अर्जुन विषाद
अध्याय १, श्लोक २८ ते ४६ मध्ये अर्जुन ची मनस्थिती आणि विषाद आजच्या संदर्भात जाणून घेऊ.
अर्जुन उवाच:
दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥१.२८॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते ॥१.२९॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥१.३०॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥१.३१॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥१.३२॥
येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥१.३३॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥१.३४॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥१.३५॥
निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥৷१.३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥१.३७॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥१.३८॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥१.३९॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥१.४०॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥१.४१॥
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥१.४२॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥१.४३॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥१.४४॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥१.४५॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥१.४६॥
संजय उवाच:
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥१.४७॥
अतिशय उत्साहात कार्याला लागलेला अर्जुन आता या भागात विरोधीपक्षातील व्यक्तींना आपले मानून त्यांच्या मृत्यूच्या कल्पनेने विषाद करायला लागतो आणि दुखी-खिन्न होऊन त्याचे शस्त्र असलेले गांडीव धनुष्य खाली ठेवून युद्ध करण्यास नकार देतो. या प्रसंगावर प्रचलित भगवद्गीतेमध्ये खूप रोचक वर्णन वाचायला मिळते. पण ते वर्णन केवळ कुरुक्षेत्रातील परिस्थिपुरते मर्यादित असलेले पाहायला मिळते.
वास्तविक पाहता हि लढाई धर्म क्षेत्रात सुद्धा चालू आहे आणि तिथे मन, बुद्धी आणि अहंकार याद्वारे मानवी मानला हरण करून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणाऱ्या भावना उत्पन्न होतांना पाहायला मिळतात. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण उत्साहाने कार्याला लागतो आणि मनाचे विरोधाभासी विकार आपआपसात लढायला लागतात. एका बाजूला धर्म आहे, कर्तव्य आहे, दृढनिश्चय आहे, ज्ञान आहे संयम आहे व ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा आहे आणि विरोधी बाजूला अहंकार, भ्रम, आळस, कंटाळा, पळपुटेपणा ह्या भावना येतात आणि एक अतिशय हुशार व दृढनिश्चयी व्यक्ती देखील या अवगुणांना आपले मानून जवळ करून आपल्या मूळ कर्तव्यापासून दूर जातांना दिसतो.
हि हीच वेळ आहे कि आपण भग्वद्गीतेमधील दिव्य संदेश वाचून फळाची आसक्ती न ठेवता व भावना मध्ये न आणता केवळ नित्य नियत कर्म (कर्तव्य) करण्यावर भर दिला पाहिजे.
मनस्थिती आणि परिस्थिती नुसार आपला नात्यांचा आणि भावनांचा अर्थ बदलत असतो आणि ज्ञानी व्यक्ती परिस्थिती, मनस्थिती आणि भावनांचा आधार घेऊन निर्णय न घेता केवळ आपल्या ध्येयाप्रती असलेले कर्तव्य कर्म करत राहतात. उदाहरणार्थ माझ्यासार खी विद्यार्थीनी आहे, जर मी परिस्थिती, मनस्थिती आणि भावनांच्या आधारे अभ्यास करायला लागले तर निश्चितच काही विषयात माझे मन मला साथ देईल व माझ्या भावना साकारात्मता असेल पण हे देखील होऊ शकेल कि बोर होतंय, मला हा विषय, शिक्षक, शिक्षकाची शिकवण्याची पद्धत ई. आवडत नाही असे कारण देऊन मी कार्य ( अभ्यास ) पुढे ढकलू शकेल व माझ्या कर्तव्यापासून दूर जाण्याची शक्यता वाढेल. इथे मी स्वतःला अर्जुन मानले तर हा माझा अर्जुन विषाद होईल. विषाद म्हणजे मनाच्या नाकारात्मकतेमुळे नियत कर्तव्य कर्म न करणे किंवा नियत कर्तव्य कर्म करण्याविषयी नकारात्मक भाव मनात येणे. अश्या वेळेस स्वतःलाच अर्जुन मानून प्रामाणिक गुरूला शरण जाणे आवश्यक आहे.
श्रीमदभगवद्गीतेच्या माध्यमातून, श्री भगवान कृष्णांनी आपल्या या प्रामाणिक गुरुची भूमिका पार पाडली आहे. गरज आहे तर ती केवळ समर्पित भावाने आपण अध्ययन करून कार्य करण्याची आणि याबाबतच मार्गदर्शन येणाऱ्या अध्यायात आपणास मिळणार आहे आणि मला आशा आहे कि भगवान कृष्ण कृपेने, मी योग्य पद्धतीने हि मार्गदर्शक तत्वे आपणा पर्यंत पोहचवू शकेन.
इति श्री कृष्ण चरणमास्तु|
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। ॥ १॥
पुढील भागात आपण अध्याय दोन प्रारंभ जाणून घेऊ
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 5)-पार्थद्वारे (अर्जुनाद्वारे) सैन्य निरीक्षण आणि संजय द्वारा प्रसंग वर्णन
http://nisha-channe.blogspot.com/2021/05/5.html
भाग 7) अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग
गीतेचे सार

Indeed👍
उत्तर द्याहटवाThe duty , though it is difficult and is different for each one of us, we have to be loyal towards our duty.
Thank you so much 🙏 for emphasizing importance of duty.