8) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो; जीवनात प्रगतीचा राजमार्ग





माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


8) अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो


अर्जुन उवाच,

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
- यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषाम-
 स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥२.६॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे 
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥२.७॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्या- 
द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्रमृद्धं-
 राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥२.८॥


हा कोणत्याही ज्ञानार्थी शिष्यासाठी अतिशय महत्वाचा श्लोक आहे असे माझे मत आहे, या श्लोकात अर्जुन पूर्ण समर्पण करून भगवंताचे शिष्यत्व घेऊन योग्य मार्गदर्शनाची प्रार्थना करतांना दिसतो. इथे अर्जुनाची भूमिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जुन म्हणाला, हे माझ्या मनाच्या दुर्बलतेमुळे माझी स्मृती नष्ट झाली आहे, मला काय योग्य आणि काय आयोग्य याचे भान राहिलेले नाही त्यामुळे, हे मधुसूदन कृपया मला आपला शिष्यत्व देऊन माझ्यासाठी काय योग्य आहे याचे मार्गदर्शन करावे.

वाचक मित्रांनो जीवनात प्रगतीचा राजमार्ग या श्लोकात दिसून येतो. जीवनात अनेक वेळा आपण अज्ञान, मनाची दुर्बलता, परिस्थिती तसेच भावनाच्या ओघात पदभ्रष्ट होतो आणि अश्या वेळी अज्ञानी लोक स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यात वेळ वाया घालवतात आणि जीवनभर कठीण समयाला सामोरे जातात. या श्लोकात माझ्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही सांगावे हि याचना खूप महत्वाची आहे. बहुतांश वेळा अनुभवी, श्रेष्ठ व ज्ञानी गुरूला आपल्यापेक्षा अधिक माहित असते कि आपल्यासाठी काय योग्य आणि आणि आपल्या अनुभवादारे व ज्ञानाद्वारे प्रामाणिक गुरु आपल्याला निश्चितच उत्तम मार्गदर्शन करू शकतात. केवळ प्रामाणिक व ज्ञानी गुरूला शरण जाणे हाच यशाचा महामार्ग आहे.

गुरु त्यांच्या ज्ञान व अनुभवाद्वारे आपला वेळ, श्रम आणि पैसासुद्धा वाचवू शकतात आपला ध्येय गाठण्याचा प्रवास हा सहज, सुलभ आणि जलधि होतो. वेळ, श्रम आणि पैसा या त्रयी मध्ये मला "पैसा" हा मुद्दा सुद्धा आजच्या संदर्भात संयुक्तिक वाटतो. ज्ञान व अनुभव दानाची परंपरा आधुनिक काळात लोप पावून ज्ञान व अनुभव विक्री सुरु झाली आहे असे आजकाल बरेचदा आपल्याला अनुभवायला मिळते.

आजकाल कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनात यश मिळवायचे असेल तर योग्य गुरुची कृपा खूप महत्वाची आहे असे मला वाटते. मी भाग्यवंत आहे कि मला कमी वयात योग्य गुरु मिळाले व संपर्पणाचे महत्व देखील मला भगवद्गीता अध्ययन करतांना समजले आणि त्यामुळेच मी वयाच्या १४व्या वर्षी गुणाची कृपा व तुम्हा वाचकांच्या आशीर्वादाने हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

संजय उवाच:

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इतिगोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥२.९॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥२.१०॥

आता आपण शरणागत शिष्याला मार्गदर्शन करण्याची पद्धती जाणून घेऊया, या श्लोकात भगवान कृष्णाला हृषीकेश(इंद्रियांचा स्वामी) तर पार्थ (अर्जुनाला) गुडाकेशन (निद्रेवर विजय मिळवलेला) असे संबोधले गेले आहे आणि यातच समानता व सन्मान दिसून येत आहे, जेव्हा कुणी प्रामाणिक गुरूला शरण जातो तेव्हा गुरु त्याव्यक्तीला अतिशय प्रसन्न मुखाने स्वीकार करतात आणि मार्गदर्शन करतात. इथे कुठेही शरणागत व्यक्तीच्या परिस्थिती किंवा मनस्थितीची अवहेलना दिसून येत नाही तर अतिशय संयमाने आणि जबाबदारीने भगवंत मार्गदर्शनाला सुरुवात करतांना दिसत आहेत.

पुढील भागात आपण बघणार आहोत
“भगवद्गीता रूपाने जीवनातील परम सत्य कथन व सांख्य योग (वैश्लेषिक) विवरण”

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 7) अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग
गीतेचे सार

भाग 9)-जीवनातील परम सत्य 

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर! 🌼
    जय श्रीकृष्णा!🌺🙏

    उत्तर द्याहटवा
  2. छान गुरु मिळण्यासाठी पूर्वसंचित पुण्य व कर्म कामी येते का??

    उत्तर द्याहटवा
  3. If you get a Guru at the right age, you will definitely find direction. Your efforts are directed in the right direction. I am happy that my daughter Shivanjali and Shivendra will not struggle for their goal because they have RC sir as a Guide in path of their life. Thanks again Nisha from botom of my heart

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ