9) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवद्गीता रूपाने जीवनातील परम सत्य कथन व सांख्य योग (वैश्लेषिक विवरण)





माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


9) भगवद्गीता रूपाने जीवनातील परम सत्य कथन व सांख्य योग (वैश्लेषिक विवरण)

इथून पुढे सांख्य योग (वैश्लेषिक विवरण) सांगण्यास भगवंत सुरुवात करत आहेत. यात जीवनाची मूळ मूल्ये आणि सत्य सांगण्यात आली आहेत. इथे महाभारतातील एका घटनेतील यक्ष आणि युधिष्ठीर यांच्या संवादातील एक अतिशय उत्तम व महत्वपूर्ण प्रश्न समोर सादर करत आहे, आपल्या चारही भावंडांच्या जीवनप्राप्तीसाठी धर्मराज युधिष्ठीर यांना यक्षाने अनेक प्रश्न विचारले होते त्यापैकी हा प्रश्न सांख्ययोग समजून घेण्यापूर्वी एकदा नजरेसमोरून जावा असे मला वाटते.


यक्ष: या जगातील कोणती गोष्ट तुम्हाला ज्यास्त आश्चर्यकारकक वाटते?
युधिष्ठीर: जगातील प्रत्येक मनुष्य, दररोज अनेकानेक प्राणी व जीवजंतूंचा मृत्यू होताना पाहत असतो तरीही मनुष्य अमर होण्याची स्वप्न पाहत असतो आणि जीवन कधीच संपणार नाही या अविर्भावात जगत असतो.
वाचकांना मला काय सूचित करायचे आहे हे कळले असेल अशी आशा करून मी भगवंताची वाणी पुढे कथन करायला सुरुवात करते.

श्री भगवानुवाच:

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥२.११॥

येथे अर्जुन म्हणजेच, प्रत्येक वाचकांसाठी हा सर्वात महत्वाचा संदेश आहे असे माझे मत आहे, इथे भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात कि हे अर्जुन तू पंडिताप्रमाणे बोलत आहेस आणि जे शोक करण्यासाठी योग्य नाहीत त्यांच्यासाठी शोक करत आहेस. आता इथे समजून घ्यायला पाहिजे कि बहुतांश लोक जे या भौतिक जगात जगत आहेत ते जगाच्या मूलभूत सत्याबाबत अनभिज्ञ आहेत आणि तरीही ते ज्ञानी असल्यासारखे बोलत असतात आणि नश्वर जीवनातील वेगळ्या वेगळ्या स्थितीविषक दुर्लक्ष करण्याचा दृष्टिकोन ठेवून जगावर राज्य करण्याची स्वप्न पाहतात. याविषयीचे पुढील माहिती भगवान पुढील भागात देतात.

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥२.१२॥

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥२.१३॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः। आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥२.१४॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ। समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥२.१५॥

सतत अस्तिवात असलेल्या आत्म्याला जन्म, बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ तसेच त्यानंतर मृत्यू व पुन्हा पुढील शरीरात हा सतत होणारा प्रवास हा अतिशय नियमित व निश्चित असून प्रत्येक मनुष्य या अवस्थांमधून जात असतो. तरीही प्रत्यक्ष मनुष्य या अवस्थांमधून जात असतांना प्रत्येक अवस्थेतील अतिशय नैसर्गिक अश्या अनुभवातून जातांना सुद्धा अनेक सुख दुःख अनुभवत असतो. आणि परमेश्वर सांगतात कीं जीवनातील प्रवासात या अनुभवांना सामोरे जाताना व्यक्तीने स्थिरबुद्धी राहणे अतिशय जरुरीचे आहे.

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥२.१६॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥२.१७॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥२.१८॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥२.१९॥

न जायते म्रियते वा कदाचि- न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो- न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२.२०॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥२.२१॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२.२२॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२.२३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२.२४॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि॥२.२५॥

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥२.२६॥

जातस्त हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२.२७॥

गीतेचे अवतरण होत असलेल्या या भागात भगवंत जगातील परमसत्य सांगताना दिसतात, इथे परमेश्वर भगवान कृष्ण सांगतात कि आत्मा म्हणजेच कोणत्याही जीवाच्या शरीरातील चेतना, ज्याला जीवन ऊर्जा किंवा जीवात्मा सुद्धा म्हटले जाते त्याला कोनोही मारू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, हा आत्मा (जीवन ऊर्जा) केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि सदैव चिरंतन असे त्याचे अस्तित्व आहे. हा योगायोग आहे का आणखी काही हे वाचकांनी ठरवलेले ज्यास्त संयुक्तिक ठरेल कि थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे. उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो. विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते.

माझे वैयक्तिक मत आहे कि प्राचीन भारतातील विज्ञान हे अतिप्रगत होते. आणि आता जे आधुनिक विज्ञान नवीन नवीन प्रगती होत आहे यातील अनेकानेक आविष्कार आपल्या संस्कृतीला आधीच ठाऊक होते आणि जसे अध्याय चार मध्ये भगवंत सांगतात कि कालांतराने गुरु शिष्य परंपरा खंडित झाली आणि हे ज्ञान लुप्त झाले.

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥.

भगवंत पुढे सांगतात शरीर नश्वर आहे म्हणजेच असत् (नाशवंत) व चेतना, आत्मा सत् (चिरंतन) आहे आणि सत् व असत् यातील फरक लक्षात घेऊन जीवन जगणारा स्थिर बुद्धी व्यक्ती मोक्ष प्राप्तीस योग्य ठरतो. येथे मोक्ष प्राप्तीचा अर्थ समाधान प्राप्ती असा आहे. मोक्ष शब्द हा केवळ जीवनापलीकडील मुक्ती व परमधामाची प्राप्ती पुरता मर्यादित नसून मनुष्य जीवन समाधानात जगत ८४ लक्ष योनीमधील सर्व श्रेष्ठ योनी लाभल्याचा पूर्ण उपयोग करण्यास पात्र ठरतो.

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२.२८॥

येथे भगवंत ‘परमसत्य’ स्प्ष्ट सांगतात कि प्रत्येक जीव यात तुम्ही आणि मी सुद्धा आहोत, जन्माआधी अप्रकट असतात आणि जन्मानंतर प्रकट होतात व मृत्यूनंतर पुन्हा अप्रकट होतात. म्हणजेच वाचकाने लक्षात घेतले पाहिजे कि आपल्याकडे व्यक्त रूपात मर्यादित वेळ आहे आणि ज्या गोष्टी निश्चित आहेत त्या गोष्टीप्रती स्थिरभाव ठेवून आपले नियत कर्म करून मानव जन्माचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा.

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन- माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः।
आश्चर्यवच्चैनमन्यः श्रृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्॥२.२९॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि॥२.३०॥

या भागात भगवान आत्मा विषयक माहिती देत आहे आणि खरंच यातील प्रत्येक शब्द हे एक गूढ आश्चर्य आहे, आत्मा विषयक ज्ञान अनेक जण आश्चर्यपूर्वक पाहतात अनेक महात्माजणांनी आत्मा विषयक माहिती दिली आहे तसेच आत्म्याच्या (साधारण भाषेत शरीरातील चेतना / ऊर्जा) प्रवासाला आपण सगळेच जण दररोज पाहत असूनही आणि त्याविषयी ऐकून घेऊनही त्याला जाणत नाहीत आणि असत् जगातील नाशवंत भौतिक गोष्टींच्या मागे लागून जगातील अनेक सुख दुःखाच्या पाशात अडकून राहतो

या भागात अंतिम सत्य सांगताना भगवंत म्हणतात कि आत्म्याला मारता येत नाही आणि शरीराचा क्षय त्याच्या गतीने होतच असतो त्यामुळेच आपण जगतातील संपूर्ण प्राणिमात्रांसाठी शोक करण्याची गरज नाही आणि व्यक्तीने आपल्या नीयत नित्य कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आणि त्याविषयी भगवंत पुढील भागात मार्गदर्शन करत आहेत.

।। जय श्रीकृष्णा ।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 8)- अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो

भाग) 10- क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन

टिप्पण्या

  1. Sunder. शाश्वत सत्य माझा आत्मा अविनाशी तर शरीर ही अल्प भेट आहे भगवंता कडून मिळालेली. Thank you for such a grt learning nisha.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ