20) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- फलासहित विविध यज्ञविधींचे वर्णन
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
श्लोक 24-33 मध्ये बघूया फलासहित विविध यज्ञविधींचे वर्णन
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्रौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥२४॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥२५॥
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥२६॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥२७॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥२८॥
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ।
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ॥२९॥
या भागात भगवंत फळासहित यज्ञाचे वर्णन सांगत आहेत
ज्या यज्ञात ( नियोजित कार्यात ) प्रयोजन ( उद्देश ), वापरलेल्या वस्तू, यज्ञकर्ता, यज्ञकर्म सगळेच ब्रम्ह म्हणजेच पवित्र आहेत ( लोककल्याणार्थ आहेत ) अश्या यज्ञाचा कर्ता ब्रम्ह ( पवित्र स्थिती – मनस्वास्थ, मनःशांती आणि प्रगती ) प्राप्त करतो. काहीजण देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करतात व त्यांची चांगल्या प्रकारे उपासना करतात ( उदा. लक्ष्मी पूजा, गणेश अर्चना, हनुमान पूजा. ) आणि काही लोक परब्रह्म अग्निमध्ये यज्ञ अर्पण करतात. म्हणजेच सर्वोच्य शक्तीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करतात. काही जण इंद्रिय संयमन करतात (ब्रम्हचर्य ) तर इतर जण नियमानुसार संयमित पणे ( गृहस्थाश्रमी ) इंद्रियविषयाची इंद्रियाग्नीमध्यें आहुती देतात. इतर साधक इंद्रिय आणि मन संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करत ते इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रियांची आहुती देऊन मननियंत्रण करतात. म्हणजेच इंद्रियविषयांची आहुती देतात. इंद्रिय विषयाचा त्याग करतात. आणखीही काही यज्ञ आहेत जसे कि, काही जण कठोर व्रत करतात, काही जण आपल्याजवळील द्रव यज्ञासाठी ( दान ) वापरतात. काही जण खडतर तपस्या करतात, काहीजण अष्टांगयोग करतात तर काहीजण वेदांचे अध्ययन करतात. या व्यतिरिक्त काही जण प्राणायाम करून समाधी अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक आहार नियमन करून यज्ञ करतात.
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ।
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ॥३०॥
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥३१॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥३३॥
असेच अनेक प्रकारचे यज्ञ असले तरीही महत्वाचे हे कि, यापैकी जे लोक यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणतात ते सनातन ब्रम्ह अस्वस्थेस प्राप्त होतात. जी व्यक्ती ‘स्व’ ला प्राध्यान्य न देऊन लोककल्याणार्थ यज्ञ करते त्या व्यक्तीला चिरंतन ब्रम्ह अवस्था प्राप्त होते. व ती व्यक्ती विविध प्रकारातील कोणताही यज्ञविधी करुन मनस्वास्थ मनशांती सह प्रगती प्राप्त करते. त्यामुळेच हे अर्जुन तू जाण कि यज्ञ केल्याविना मनुष्याला आज जर समाधान व सुख प्राप्त होत नाही तर भविष्यात (पुढील जीवनात व जीवनातील पुढील टप्प्यात ) सुख, समाधान कसे प्राप्त होईल?. उपरोक्त सर्व प्रकारचे यज्ञ हे वेद संमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. व त्यांना त्यांच्या प्रयोजनासह जाणणारा नक्कीच मुक्त होतो. केवळ द्रव्ययज्ञ ( दान ) करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे त्यामुळेच हे परंतप तू कर्मयज्ञ कर कारण सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान हे ज्ञानातच होते.
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 19) कर्म विकर्म अकर्म
भाग 21) ज्ञानाचे महत्व आणि अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा

खुपचं छान विश्लेषण!
उत्तर द्याहटवाछान खूपच
उत्तर द्याहटवा