28) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- मार्गभ्रष्ट झालेल्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

28) मार्गभ्रष्ट झालेल्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन

अर्जुन उवाच

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥३३॥

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३४॥

परमेश्वरकडून ध्यान योग्य पद्धती जाणून घेतल्यावर अर्जुनाने अतिशय उत्स्फूतपणे आपली अडचण मांडण्यासाठी आणखी एक स्वाभाविक प्रश्न केला . अर्जुन म्हणणं हे भगवंत ज्या योगपद्धतीचे तुम्ही वर्णन केले आहे ती आचरणात आणण्यास अव्यावहारिक आहे कारण मन हे खूप चंचल आहे आणि अत्यंत हट्टी तथा बलवान आहे आणि मनाला नियंत्रित करणे वायूला नियंत्रित कारण्यापेक्षाही अधिक अवघड आहे.

श्रीभगवानुवाच,

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥३५॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥३६॥

यावर उत्तर देतांना भगवंत अतिशय स्पष्टपणे सांगतात कि हे अर्जुन तुझे म्हणणे अतिशय योग्य आहे मनाला नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे आणि असे असले तरीहही अभ्यासाने म्हणजेच सरावाने आणि त्यागाने हे शक्य होते. मला कळालेली हि एक अतिशय महत्वाची शिकवण आहे कि हे काम सोपे नाही आणि जी व्यक्ती सर्व करून प्रयत्नपूर्वक मनाला नियंत्रित करते ती व्यक्ती नक्कीच योगी इष्ट कार्यात यशस्वी होते. इथे भगवंत श्रीकृष्ण स्वतःचे मत सुद्धा देतात कि ज्याचे मन असतात आहे त्याला यशप्राप्ती कठीण आहे तर ज्याचे मन स्थिर आहे त्याची यशप्राप्ती हि ध्रुव ताऱ्याप्रमाणे निश्चित आहे.

अर्जुन उवाच

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७॥ 

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । 
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८॥ 

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । 
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥३९॥

कुठल्याही सामान्य माणसाला सामोरे जावे लागणारी हि अडचण आहे आणि याविषयी मार्गदर्शन मागतांना अर्जुन विचारतो कि हे कृष्ण जो व्यक्ती अतिशय उत्साहाने योग (ध्येय्याकडे वाटचाल) सुरु करतो पण अंतिम समयी मनाच्या खेळांना बळी पडून तात्कालीन सुखासाठी योगमार्ग भ्रष्ट्र होतो अश्या व्यक्तीचे पुढे काय होते? कारण अशी शक्यता निर्माण होते कि अशी व्यक्ती न तर इकडे न तर तिकडे सफल होते आणि अश्या व्यक्तीला पुढे काय करावे लागते. हे कृष्ण हा माझा संशय आहे आणि केवळ तुम्हीच हा संशय दूर करू शकता तर कृपया मार्गदर्शन करावे. जर तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आले कि तुम्ही मध्येच विचलित होऊन कार्य सोडून दिले तर पुढील भागातील मार्गदर्शन वाचक रुपी अर्जुनाला खूप महत्वाचे ठरणार आहे.

श्रीभगवानुवाच,

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न 
हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥४०॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । 
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥४१॥ 

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्। 
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥४२॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । 
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥४३॥

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः । 
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥४४॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । 
अनेकजन्मसंसिद्धस्ततो यात परां गतिम् ॥४५॥

आनंदाची बातमी, भगवंत म्हणाले कि कोणतीही व्यक्तीं जी योग करायला लागते व नंतर काही कारणास्तव मार्गभ्रष्ट होते त्या व्यक्तीचा कधीही नाश होत नाही आत्मोद्धार अर्थात भगवत्प्राप्तिसाठी ( ध्येय प्राप्तीसाठी )  कर्म करणाऱ्या मनुष्याची कधीही दुर्गती होत नाही.  मार्गभ्रष्ट झालेला व्यक्ती जर योग्य व्यक्ती आणि वातावरणात असेल तर तो कालांतराने तो पुन्हा योग्य मार्गावर येतो. किंवा योग्य वेळी अश्या व्यक्तीला ज्ञानी व्यक्तीचा संसर्ग ( भेट ) होऊन अशी व्यक्ती पून्हा योग्य मार्गावर येण्यासाठी प्रेरित होते. आणि पुन्हा अधिक जोराने ध्येयाकडे वाटचाल करायला लागते. कधी कधी अशी व्यक्ती परिस्थिमुळे योग्य कार्याला लागते आणि पुन्हा प्रगती करायला लागते. उदा. एकादी व्यक्ती चांगले कार्य करत असतांना मध्येच कार्य सोडून जाते पण कुणीतरी व्यक्ती त्याची प्रतिभा ओळखून त्याला त्याच कार्यात लावते. आणि प्रयत्नपूर्वक कार्य करणारा योगी लगेचच आपली जुनी पात्रता प्राप्त करतो आणि तिथून पुढची प्रगती सुरु होते. आणि मधील काळात मार्गभ्रष्ट झाल्याचा परिणाम वेगाने कमी होऊन लोप पावतो व प्रगती सुरु होते व लवकरच ध्येय प्राप्ती होते.

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । 
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना । 
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥

कर्मफळाची आसक्ती न बाळगता जो निष्ठापूर्वक आपले नीयत कर्म करत असतो असा योगी हा तपस्वी, ज्ञानी किंवा सकाम कर्म करणाऱ्या व्यक्ती अश्या तिन्ही प्रकारच्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणूनच भगवंत कृष्ण वाचक रुपी अर्जुनाला सांगतात कि हे अर्जुन तू योगी हो आणि मन्नीग्रह करून  निष्काम कर्म कर.  आणि समस्त योगिजनांमध्ये सुद्धा जो योगी सतत माझी भक्ती करतो तो मला सर्वश्रेष्ठ योगी म्हणून मान्य आहे.  सतत परमेश्वर भक्ती या शब्दाच्या अर्थसाठी या आधीच्या दोन भागाचा संदर्भ घ्यावा.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥6॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 27) योगी कोण आहे ?

29) अध्याय 7 प्रारंभ :- विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता

टिप्पण्या

  1. खुप सुंदर आणि अतिशय अभ्यासपूर्ण असे हे विवेचन वाचून निदान माझे तरी याबाबत मनस्वी समाधान झाले आहे, असे मला तरी वाटते.

    आपणास पुढील सदरबाबतच्या पुण्य कार्यासाठी मन:पूर्वक अभिवादन आणि अनंत शुभेच्छा...!!!
    "जय श्री कृष्ण"...
    🙏🌹💐👌👍👍👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ