29) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय 7 प्रारंभ :- विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-

राजेश्वरी

29) अथ सप्तमोऽध्यायः-
ज्ञानविज्ञानयोग
विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता


श्रीभगवानुवाच,

मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥१॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥२॥

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः ॥३॥

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहङ्‍कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥४॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌ ॥५॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥६॥

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥७॥

मागील अध्यायात भगवंत श्रीकृष्ण म्हणाले कि, योगी व्यक्ती सर्व जीवांना समभावाने पाहतो आणि प्रत्यक्ष जीवांमध्ये परमेश्वर आणि परमेश्वराला प्रत्यक्ष जीवांमध्ये पाहतो, आणि जो अश्याप्रकारे पाहतो त्याच्यासाठी परमेश्वर अदृश्य नसुन सर्वत्र प्रत्यक्ष प्रकट स्वरूपात असतात. पण प्रत्यक्षात असे करणे सामान्य माणसाला अवघड आहे आणि हे जाणूनच भगवंत सातव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच यावर अधिक प्रकाश टाकतात.

श्री भगवान म्हणाले, हे पार्थ तू पूर्णपणे माझ्या भावनेत युक्त होऊन कश्या प्रकारे योगाभ्यासाद्वारे माझ्यावर ध्यान केंद्रित करून मला सर्वथा व शंकारहित होऊन कसा जाणू शकशील ते आता ऐक. मी तुला आता प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असे दोन्ही प्रकारचे ज्ञान सांगेन हे समजल्यावर तुला आणखी काही जाणून घ्यायचे शिल्लक राहणार नाही. आणि हे सुद्धा जाण कि हजारो मनुष्यापैकी कोणी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणार्यांपैकी देखील विरळाच मला तत्त्वता जाणतो. या भागात भागवंत अतिशय महत्वाची माहिती देतात. भगवंत सांगतात कीं भूमी, जल, अग्नी वायू, आकाश, मन ,बुद्धी आणि अहंकार अश्या माझ्या आठ प्रकारच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत आणी हे महाबाहू अर्जुन याव्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ आणि भौतिक प्रकृतीचा उपभोग घेतात.
परा प्रकृती म्हणजेच जड प्रकृती आणि अपरा प्रकृती म्हणजेच चेतना (याला आपण जीव किंवा ऊर्जा सुद्धा म्हणतो) सर्व जीव या दोन शक्तीच्या संयोगाने अस्तित्वात येतात. या जगतामध्ये जे काही आहे त्याची उत्पत्ती आणि विनाश करणारा मीच आहे. आता वरील वाक्याकडे जर नीट लक्ष देऊन पहिले तर आपल्याला लक्षात येईल कि अष्टधा प्रकृती आणि चेतना याच्या संयोगानेच सगळे जीव जन्माला येतात आणि किती आश्चर्यकारक आहे कि मनुष्याला या गोष्टी समजायला खूप प्रयोग करत बसावे लागत आहे.

भगवंत पुढे सांगतात कि हे धनंजय परा आणि अपरा प्रकृतीच्या माध्यमातून मीच सर्व सर्व कारणाचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व काही आहे. हे सगळे जग माझ्या परा आणि अपरा प्रकृतीद्वारे माझ्यामध्ये ओवलेले आहे जसे मालेतील मोती धाग्याद्वारे जोडलेले असतात.

संपूर्ण पदार्थांचे कारण स्वरूप भगवंताच्या व्यापकतेचे कथन

श्रीभगवानुवाच

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥८॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥९॥

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्‌ । बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ ॥१०॥

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्‌ ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥११॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्चये । मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥१२॥

भगवंत पुढे परा आणि अपरा प्रकृतीद्वारे भगवंताचा अंश असलेले काही संदर्भ देतात जसे कि, मीच पाण्याचा रस आहे, चंद्र-सूर्याचा प्रकाश आहे, वेदांमधील ओंकार आहे, आकाशातील शब्द आहे, पुरुषातील पुरुषतत्व आहे.
मी पृथ्वीचा सुंगध, अग्निमधील उष्मा, सर्व जीवांमधील जीवनशक्ती आहे. तपस्व्याचे तप मी असे सांगत असतांना भगवंत म्हणतात कि अस्तित्वातील सर्व वास्तूचे बीज मी आहे. तसेच बुद्धिमानांची बुद्धी आणि शक्तिमानाची शक्ती मी आहे, बलवानाचे बळ काम आणि आसक्तीविरहित बळ मी आहे. तसेच धर्मतत्वाविरुद्ध नसणारी प्रबळ इच्छा ( काम ) सुद्धा मीच आहे. तिन्ही गुणन
रजो, सतो आणि तमो हे गुण सुद्धा माझ्या शक्तीनेच निर्माण होतात आणि एका तर्हेने मीच सर्वत्र आहे. असे असूनही मी स्वतंत्र आहे. मी प्रकृतीच्या गुणांच्या आधीन नाही तर तेच माझ्या आधीन आहेत. आता नीट विचार केला आणि पहिले तर आपल्याला समजेल कि विश्वातील प्रत्येक गोष्ट हि अष्टधा परा आणि अपरा प्रकृतीचा संयोग आहे आणि या परा आणि अपरा प्रकृतीचा स्वामी म्हणजेच भगवान कृष्ण आहेत आणि त्याच्या प्रकृतीच्या अंशाने सर्व सृष्टी बनलेली आहे आणि जो हि गोष्ट जाणतो तो सर्व चराचरात भगवंताला पाहतो.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 28) मार्गभ्रष्ट झालेल्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन

भाग 30) भगवंत भक्तांची स्तुती व
नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ