31) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-

राजेश्वरी

31) भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा


अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्‌ ॥२४॥

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्‌ ॥२५॥

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥२६॥

अध्याय 7 च्या शेवटच्या भागात भगवंत सांगतात की,
अज्ञानी लोक त्यांच्या अज्ञानामुळे मला अविनाशी आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराला जाणत नाहीत. ते केवळ मला माझ्या मनुष्य रूपात पाहतात. मूढ तथा अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, म्हणजेच मी सर्वत्र असुनही ते मला पाहू शकत नाहीत. माझ्या अंतरंगा शक्तीमुळे मी त्यांच्यासाठी सदैव अप्रकटच राहतो आणि ते माझे अजन्मा आणि अच्युत स्वरूप जणू शकत नाहीत. हे अर्जुन मी परमेश्वर आहे आणि मी भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानात घडणारे सर्व आणि भविष्यात घडणारेही सर्व काही जाणतो. कारण सर्व जीव माझ्या प्रकृतीने बनलेले आहेत आणि मी सर्व जीवांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाही.

जसे आपण जेव्हा पाणी फ्रिज मध्ये ठेवतो तेव्हा त्याचा बर्फ़ होणार आहे कधी, किती वेळात इ. तसेच पाणी गरम केल्यावर त्याची वाफ होते हे जसे आपण सामान्य मनुष्य सहज जाणतो, तसेच आपले जड आणि चेतन तत्व व त्यावर होणार त्रिगुणाचा परिणाम जाणणारे भगवंत कृष्ण आपल्या सर्वांचे भूत, वर्तमान आणि भविष्य अतिशय सहजतेने जाणतात.

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥२७॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्‌ । 
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥२८॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये । ते 
ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्‌ ॥२९॥

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । 
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥३०॥

भगवान कृष्ण म्हणाले,
हे परंतप इच्छा आणि द्वेष यापासून उत्पन्न होणाऱया द्वंद्वामुळे सर्व जीव मोहित होतात आणि कार्य करत असतात. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्में केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे नष्ट झाली आहेत, ते या इच्छा आणि द्वंद्वा च्या मोहातून मुक्त होतात आणि माझ्या सेवेत निष्ठापूर्वक युक्त होतात. जरा आणि मरण यातून मुक्त होण्यासाठी जे बुद्धिमान मनुष्य प्रयत्न करत आहेत ते माझ्या श्रीभगवान कृष्णाच्या भक्तीचा आधार घेतात. अशी व्यक्ती ब्रह्म आहे कारण त्यांना अध्यात्मिक कर्माचे पूर्ण ज्ञान आहे. असे लोक मला सर्व सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, तसेच सर्व यज्ञाचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात आणि अश्या मनुष्याला मृत्यूसमयी सुद्धा माझी जाण आणि प्राप्ती सुलभ असते.  

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे 
श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 30) भगवंत भक्तांची स्तुती व
नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा


भाग 32)अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग:-
ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ