33) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- योग सिद्ध मनुष्याची गति
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
33) योग सिद्ध मनुष्याची गति
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥8.8৷৷
कविं पुराणमनुशासितार-मणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूप-मादित्यवर्णं तमसः परस्तात् ৷৷8.9৷৷
प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्- स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ৷৷8.10৷৷
या भागात भगवंत सांगतात कि आपण भगवंताला कोणकोणत्या रूपात पाहू शकतो. आणि कोणकोणत्या प्रकारे भगवंताची पूजा करू शकतो.
प्रथम आपण भगवंताची रूपे पाहूया. भगवंत म्हणतात हे पार्थ अभ्यासपूर्वक मन एकाग्र करून मनाला जो पुरुष भगवंतामध्ये स्थिर करतो आणि सतत भगवंताचे स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते.
आधुनिक अर्जुन हाच नियम सर्व प्रकारच्या ध्येय प्राप्तीसाठी वापरू शकतात. भगवंत सांगतात कि मला सर्वत्र, पुरातन, सर्वांचा नियामक, अणूपेक्षाही अतिसूक्ष्म, सूर्यापेक्षाही तेजस्वी, सर्वांचा पालनकर्ता, सर्व भौतिक कल्पनांच्या पलीकडील दिव्या अश्या नित्य पुरुष स्वरूपात ध्यान केले पाहिजे म्हणजेच परमेश्वर यत्र तत्र सर्वत्र आहेत.
जो मनुष्य अंतकाळी आपले ध्यान दोन्ही भुवयांमध्ये स्थिर करतो आणि योगसामर्थ्यद्वारे अविचलित भावाने भक्तीयुक्त होऊन परमेश्वराचे स्मरण करतो त्याला परमेश्वर नक्कीच प्राप्त होतात. परमेश्वर प्राप्ती चा, हा नियम कुठल्याही धेय्य प्राप्तीसाठी सुध्दा वापरला जाऊ शकतो.
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ৷৷8.11৷৷
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥8.12৷৷
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ৷৷8.13৷৷
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनीः ৷৷8.14৷৷
भगवंत पुढे म्हणाले, ओंकाराचे उच्चारण करणारे संन्यासमहर्षी ब्रम्हामध्ये प्रवेश करतात आणि सिध्दी प्राप्त करण्याची इच्छा असणारे ब्रह्मचर्य पालन करतात.
आता मी तुला अश्या संक्षिप्त विधिविषयी सांगतो कि ज्याद्वारे मनुष्य मुक्ती प्राप्त करू शकतो.
● पहिली पायरी - शरारांची सर्व नऊ द्वारे संयमित करून या इंद्रियांवर विजय मिळवून त्यांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था होय.
● दुसरी पायरी - मनाला हृदयामध्ये आणि प्राणवायूला मस्तकामध्ये स्थिर करून मनुष्य स्वतःला योगामध्ये एकरूप करू शकतो.
योगामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र 'ऊँ' ओंकाराचे उच्चारण करत भगवंताचे नाव घेत जर कुणी देह त्याग केला तर त्याला निश्चितच अध्यमाची प्राप्ती होते.
● तिसरी पायरी - जो अन्य कुठलाही भाव तथा विचार मनात न ठेवता सतत माझे स्मरण करतो त्याला माझी प्राप्ती सुलभ आहे कारण असा व्यक्ती पूर्णतः भक्तीमध्ये रममाण झालेला असतो.
पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ध्येय प्राप्तीसाठी हा एक रामबाण उपाय आहे माझे धेय्य मजा भगवंत.
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ৷৷8.15৷৷
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ৷৷8.16৷৷
आता पुढचा टप्पा पाहूया. मनुष्य योगी झाला कि काय होते.
परमेश्वर सांगतात कि माझी ( सिद्धी ) प्राप्ती केल्यावर योगी व्यक्ती या दुःखपूर्ण तात्पुरत्या नश्वर जगात कधीच परतून येत नाही. प्राकृत जगातील अतिउच्च जगात स्वर्ग किंवा ब्रम्हलोक असो किंवाचा निम्न लोकांचे जगात असो हि सगळी लोके दुःखाची घरे आहेत. या लोकांत वारंवार जन्ममृत्यू होतात ( सुखदुःख येतात ) परंतु हे कौंतेय जो माझ्या धामाची प्राप्ती करतो तो या जन्ममृत्यू - सुखदुःखाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. येथे समजून घेण्याची बाबा हि आहे मी आत्म्यासाठी पुनर्जन्मातून मुक्ती आणि योगी व्यक्तीसाठी जगात असतांना सुख दुःख इ. भावनाच्या चक्रव्यूहातून मुक्ती.
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ৷৷8.17৷৷
अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ৷৷8.18৷৷
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ৷৷8.19৷৷
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ৷৷8.20৷৷
या भागात भगवंत सांगतात कि मानवीय गणनेनुसार सहस्त्र चतुर्युग म्हणजेच ब्रम्हाजीचा एक दिवस असतो आणि एवढीच मोठी त्यांची रात्र असते आणि जेव्हा ब्रम्हाजीचा दिवस सुरु होतो तेव्हा सर्व जीव प्रकट होतात आणि जेव्हा ब्रम्हाजीची रात्र होते तेव्हा पुन्हा हे सर्व जीव असहाय पणे लोप पावतात व अव्यक्त स्वरूपास प्राप्त होतात. याला स्वतः ब्रम्हाजीसुद्धा अपवाद नाहीत.
पण यापलांकडे असलेली भावंताची परा प्रकृती आहे जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आहे आणि ती अक्षर म्हणजेच सनातन आहे. कदाचित आधूनिक मनुष्याला न सुटलेलं विश्वाच्या उत्पत्ती आणि अंताच कोड आणि जेव्हा काहीच नव्हत तेव्हा काय होतं? ह्या प्रश्नाच उत्तर या भागात असेल असे मला वाटतं. याभागाबाबत माझी अर्धवट समज आहे, त्यामुळे या भागावर अधिक टिपण्णी आता नाही.
भगवंत कृपेने समजलं उमजल तर भविष्यात यावर टिपण्णी करेन.
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ৷৷8.21৷৷
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ৷৷8.22৷৷
स्वतः भगवंत सांगतात कि वेदांना जाणणारे ज्याला अव्यक्त ( असून नसलेले ) आणि अविनाशी असे वर्णन करतात त्यात सर्व काही सामावले जाऊ शकते ( ब्लॅक होल? आपला ऊर्जेचा सिद्धांत येथे वेगळा ठरतो ऊर्जा आत जाते आणि पुन्हा परत येत नाही. ) आणि अश्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही. आणि तेच भगवंताचे परमधाम आहे. यालाच मानसिक पातळीवर स्थिरबुद्धी, वायूमध्ये अक्रिय वायू ( Inert gases ) आणि अध्यात्मात मोक्ष असे म्हणतात.
सर्वांहून श्रेष्ठ असलेले पुरुषोत्तम भगवान विष्णू ज्यांच्या मायेने हे जग व्याप्त आहे ते केवळ अनन्य भक्तीनेच प्राप्त होऊ शकतात. आणखी एकदा भगवंत धेय्य प्राप्तीसाठी अनन्यभाव किती महत्वाचा आहे हे सांगतात. अनन्य भक्ती म्हणजे अन्य ठिकाणी लक्ष नकोच.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 32)अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग:-
ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न
भाग 34) प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा