34) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


34) प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन

यत्र काले त्वनावत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ৷৷8.23৷৷

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्‌ ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ৷৷8.24৷৷

धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम्‌ ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ৷৷8.25৷৷

शुक्ल कृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्ति मन्ययावर्तते पुनः ৷৷8.26৷৷

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ৷৷8.27৷৷

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्‌ ।
अत्येत तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्‌ ৷৷8.28৷৷


८ व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत प्रयाण काळाची वेळ आणि त्याचा परिणाम याचे वर्णन केले आहे. आणि कोणता मार्ग वापरणारे परत येतात व कोणता मार्ग वापरणारे परत येत नाहीत. 

भगवंत सांगतात, जे परम ब्रम्हाला जाणतात आणि अग्निदेवतेच्या प्रभावात, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या काळात भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रम्हाची प्राप्ती करतात. 

याविरुद्ध जे धूर असतांना किंवा रात्रीच्या समयी, कृष्णपक्षात, किंवा दक्षिणायनात मृत्यूला प्राप्त होतात ते चंद्रलोकी जातात आणि कालांतराने पुन्हा परत येतो. 

वैदिक मतानुसार या जगातून प्रयाण करण्याचे प्रकाशमय आणि अंधकारमय असे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गाने प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही. आणि जेव्हा तो अंधाराचा मार्ग वापरतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा परत येतो. 

हे अर्जुन जरी माझा शुद्ध भक्त दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित किंवा भ्रमित होत नाही. म्हणून हे वाचक रुपी अर्जुन तू सदैवं भक्तीमध्ये युक्त हो आणि प्रकाशाचा (ज्ञानाचा मार्ग वापर).
जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान, तसेच विविध कार्याच्या पुण्यफळापासून वंचित राहत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला सर्व प्राप्त होते आणि अखेर त्याला शाश्वत धामाची प्राप्ती होते.

ॐ तत्सदिति श्री मद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे 
श्री कृष्णार्जुनसंवादे अक्षर ब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥8॥


।।जय श्री कृष्णा।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 33) योग सिद्ध मनुष्याची गति

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ