41) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 1)



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

41) भगवंताच्या विभूती ची माहिती
(भाग 1)

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ १०.२१ ॥

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १०.२२ ॥

रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ १०.२३ ॥


देवी अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आहे आणि तेजस्वी ज्योतींमध्ये सूर्य मी आहे. मरूदगणामध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील जीवशक्ती चेतना मी आहे. अकरा रुद्रांमध्ये महारुद्र शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. आठ वसू मधील अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मी सुमेरु पर्वत आहे.


पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ १०.२४ ॥

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ १०.२५ ॥

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः । 
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ १०.२६ ॥


पुरोहितांमध्ये मुख्य पुरोहित ( देव पुरोहित ) बृहस्पती मला समज. हे पार्थ, मी सेनापती मधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. मी महर्षींमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये ॐ कार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आणि अचलामध्ये हिमालय पर्वत मी आहे. सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे.


उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् । 
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ १०.२७ ॥

घोड्यांमध्ये समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा मी , हत्तींमध्ये ऐरावत नावाचा गजेंद्र मी आणि मनुष्यांमध्ये राजा मी असे समज.


आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् । 
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १०.२८ ॥ 

अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ १०.२९ ॥

मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव मदन आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव मी आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितृ आणि शासन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमराज मी आहे.

।।जय श्री कृष्णा।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 40) कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ