42) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंताच्या विभूती ची माहिती (भाग 2)
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
42) भगवंताच्या विभूती ची माहिती
(भाग 2)
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ १०.३० ॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ १०.३१ ॥
मी दैत्यांमध्ये परमभक्त प्रह्लाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे.
मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे. जलचरामध्ये मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे.
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ १०.३२ ॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ १०.३३ ॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ १०.३४ ॥
हे अर्जुना, सर्व सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा निर्णायक तर्क आहे.
मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे. अक्षय अविनाशी काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला ब्रह्मदेवता मी आहे, सर्वांचे धारण पोषण करणाराही मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या सर्व उत्पत्तीचे कारण मी आहे.
स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा मी आहे.
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ १०.३५ ॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ १०.३६ ॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ १०.३७ ॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् । मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ १०.३८ ॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ १०.३९ ॥
तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि सामवेदाच्या छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष महिना ( नोव्हेंबर डिसेंबर ) आणि ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे. मी छल करणाऱ्यांतील द्यूत आणि तेजस्वी व्यक्तीचे तेज मी आहे.
विजेत्यांचे साहस आणि बालवानाचे बल मी आहे. वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये उशना अर्थात शुक्राचार्य कवीही मीच आहे.
दमण करण्याच्या सर्व साधनामध्ये मी दंड आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या गोष्टींमध्ये मौन आणि ज्ञानवानांचे ज्ञान मीच आहे. आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण ( बीज ) तेही मीच आहे. कारण असा चराचरातील एकही प्राणी नाही जो कि माझ्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल.
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ १०.४० ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ १०.४१ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ १०.४२ ॥
हे परंतपा माझ्या विभूतींना न सीमा न अंत. हा मी तुला थोडक्यात सांगितलेला विस्तार आहे. जी जी ऐश्वर्यवान, कांतियुक्त, सुंदर, तेजस्वी आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. किंवा हे अर्जुना, एवढे सगळे जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. या भागात भगवंत स्पष्ट करतात कि जे जे योग्य आणि श्रेष्ठ आहे, ते ते भगवंताची विभूती आहे आणि याचाच अर्थ मनुष्य आपले नियत कर्म करून भगवंताच्या विभूतीचीच भाग होऊ शकतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 41) भगवंताच्या विभूती ची माहिती
(भाग 1)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा