38) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भक्तीचा दुराचारी व्यक्तीवरील प्रभाव आणि भगवंताचे अनन्य भावाने भक्तीकरणाऱ्या भक्ताला वचन.
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
38) भक्तीचा दुराचारी व्यक्तीवरील प्रभाव आणि भगवंताचे अनन्य भावाने भक्तीकरणाऱ्या भक्ताला वचन.
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ९-३० ॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ९-३१ ॥
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ९-३२ ॥
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ९-३३ ॥
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ९-३४ ॥
जर एखादा अत्यंत दुराचारी, दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजत असेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया, तू हे निर्भय होऊन हे घोषित कर कि, माझा भक्त कधीच नाश पावत नाही.
हे पार्था, व्यक्ती स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाळादी कोणत्याही श्रेणीतील असो, मला शरण आलेले सर्व जण परम गतीलाच प्राप्त होतात. आता मग पुण्यशील, ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे?
म्हणून तू सुखरहित व नाशवंत या जगात मनुष्यशरीर माध्यमाने माझ्या प्रेममयी सेवेत संलग्न हो आणि सदैव माझेच भजन कर. आपले मन सदैव माझ्यात ठेव, माझे चिंतन कर. माझा भक्त हो. मला नमस्कार कर. माझी पूजा कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ॥ ९-३४ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्री कृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥9॥
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 37) या भागात भगवंत सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ या विषयी मार्गदर्शन करतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा