60) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
60) अध्याय १६ दैवासुरसंपद्विभाग योग-
मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती
भूमिका
श्री भगवान कृष्णाचे मार्गदर्शन असलेली गीतरचना श्रीमदभगवद्गीता आता अतिशय सहज आणि टप्याटप्याने पुढे जात आहे, भगवंत सहज सुलभ आपणासर्वांना पार्थ रूपात मार्गदर्शन देत आहेत. आपण पाहिले कि कश्या प्रकारे भगवंतांनी जगाची उत्पत्ती, भगवंताचे ऐश्वर्य, त्यानंतर विराट विश्वरूप दर्शनानंतर, भक्तियोग, त्यानंतर प्रकृती पुरुष आणि चेतना याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतरच्या टप्प्यात भगवंतनी आधी बद्धजीवांना बांधणाऱ्या प्रकृतीच्या तीन गुणासंबंधी मार्गदर्शन, मग स्वतः भगवंत पुरुषोत्तम आणि त्यांची माया याबाबत ज्ञान दिले. दैवी प्रवृत्ती आणि असुरी प्रवृत्ती. याविषयी सविस्तर ज्ञान
श्रीभगवानुवाच;
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १६-१ ॥
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ १६-२ ॥
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ॥
आता भगवंत मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती देत आहे आणि ह्या प्रवृत्ती आहेत दैवी प्रवृत्ती आणि असुरी प्रवृत्ती. याविषयी सविस्तर ज्ञान आता आपण भगवंतांकडून घेऊया जेणेकरून आपल्याला आपल्या आतील असुरांचा नाश करता येईल आणि दैवी प्रवृत्ती मध्ये वाढ करता येईल.
इतरांचे दोष न काढणे, सर्व भुताप्रती दयाभाव, लोभीवृत्तीचा आभाव, सौम्यता, नम्र आचरण, संकल्पाप्रती दृढता, तेजस्वीता, क्षमा, धैर्य, पवित्रता, शुची, मानसन्मानाची अभिलाषा नसणे, हे सर्व दैवी गुण आहेत.
मला वाटते कि या गुणांचे अधिक वर्णन करण्यापेक्षा वाचकरूपी पार्थाने स्वतःमध्ये यातील किती गुणांची प्रबळता आहे आणि किती गुणांचा आभाव आहे, याकडे लक्ष देण्याची विनंती मी करिन. हे स्वनिरीक्षण आपल्याला आपला पुढील मार्ग कसा असावा याविषयी मार्गदर्शक ठरेल.
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ॥ १६-४ ॥
दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ १६-५ ॥
आता भगवंत असुरी प्रवृत्ती ची प्राथमिक माहिती देतात. याचाच अर्थ पुढील वाक्यांमध्ये विहित असलेले गण हे आसुरी वृत्तीचे पाबळ सूचक आहेत असे समजावे आणि वाचकरूपी पार्थ इथे पुन्हा आत्मनिरीक्षण करतील अशी अपेक्षा आहे.
भगवंतांनी पुढे सांगितले, हे पार्था अभिमान, उर्मटपणा, दंभ, घमेंड, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी वृत्ती असलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत.
दैवीगुण संपदा हि मुक्ति प्रदान करणारी आणि आसुरी गुण संपदा हि बंधन निर्माण करणारी मानावी. परंतु हे पांडवा ( वाचक रुपी अर्जुन ), तू चिंता करू नकोस. कारण तू दैवीगुण संपदा घेऊन जन्मला आहेस. मला खात्री आहे कि भगवद्गीता अध्यायात इथपर्यंत आलेल्या आधुनिक अर्जुनामध्ये दैवी गुणांचे निश्चितच प्राबल्य आहे.
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ १६-६ ॥
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ १६-७ ॥
हे पार्था, या जगात केवळ दोनच प्रकारचे मनुष्य आहेत. पहिले दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यांपैकी मी या आधीच तुला दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता तू माझ्याकडून आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदाय आणि त्यांच्या गुणांबद्दल सविस्तर ऐक.
नीती आणि अनीती ज्ञानाचा अभाव असल्याने आसुरी स्वभावाचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठायी पवित्रता, उत्तम आचरण आणि सत्यता असत नाही
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 59) भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा