61) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण


माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

61) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् । 
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ १६-८ ॥

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । 
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ १६-९ ॥

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः । 
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १६-१० ॥


आता भगवंतांकडून आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण कसे करतात ते जाणून घेऊया. भगवंत सांगतात कि आसुरी वृत्तीचे लोक परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवंताचे अस्तित्व मानत नसल्यामुळे सांगतात की, हे जग असत्य आहे आणि याला कुणाचाही आधार नाही, हे जग कोणतीही दिव्य शक्ती ( परमात्मा ) चालवत नसून केवळ स्त्रीपुरुषांच्या संगमातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच जगनिर्मितीचे नैमित्यिक कारण आहे. त्याशिवाय जगाच्या निर्मितीचे दुसरे काही कारण तथा प्रयोजन नाही. आपल्या या अज्ञानामुळे चुकीचे निष्कर्ष काढत स्वतःच्या नाशाचे निमित्त बनत आसुरी प्रवृत्तीचे अल्पबुद्धी लोक जगासाठी अहितकारक आणि जगाचा विनाशास कारणीभूत होऊ शकतील अश्या कर्मामध्ये रत असतात.

अमर्याद आणि अनियंत्रित कामनांमुळे आसुरी लोक गर्व, खोटी प्रतिष्टा, माज, मोह यांच्या प्रभावामुळे सदैव खोटे आणि अपवित्र असे कर्म करत असतात.

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः । 
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ १६-११ ॥

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
 ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १६-१२ ॥

मरेपर्यंत चिंता घेऊन अनंत आशा बाळगत व त्यातून निर्मित विविध इच्छांची पूर्ती करणे म्हणजेच जीवनाचे खरे लक्ष मानणारे असे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक शेकडो हजारो इच्छा, आकांशा आणि आशा बाळगतात आणि त्यामधून उत्पन्न कामामध्ये बद्ध होतात. आणि असे असुरी लोक कामपूर्तीसाठी अन्यायाने धनसंचय करतात.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 60) मनुष्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या परस्परविरोधी प्रवृत्तीची माहिती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ