62) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण (भाग 2)
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
62) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण (भाग 2)
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १६-१३ ॥
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १६-१४ ॥
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १६-१५ ॥
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६-१६ ॥
धनप्राप्ती केलेला आसुरी वृत्तीचा मनुष्य माझ्याकडे एवढी संपत्ती आहे व भविष्यातील योजनांच्या आधारे मी त्यात एवढी वाढ करेन व माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. माझे हे-हे शत्रू आहेत, मी त्याला मारले आहे ( मी आणि माझे हा कर्ता भाव दुख्खाचे कारण आहे, हे आपण याआधीच समजून घेतले आहे. ) पण आसुरी वृत्तीचा मनुष्य स्वतःला कर्ता मानतो आणि स्वतःला सर्व ईश्वर मानून ( हिरण्यकशयप, रावण, कंस हि या प्रकारच्या आसुरी प्रवृत्तीचा प्रभाव असलेल्या मनुष्यांची काही उदाहरणे आहेत.) मी ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्ध, बलवान आणि सुखी आहे असे मानणारा. स्वतःला मोठा धनिक आणि मोठ्या कुळाचा प्रतिष्ठित मानणारा. मज सम मीच या आविर्भावात राहणारा. मी यज्ञ करीन. दाने देईन. मजेत राहीन आणि यालाच सर्वोत्तम जीवन मानून अज्ञानाने मोहित झालेले, भ्रमित झालेले,चिंताग्रस्त आसुर मोहाच्या जाळ्यात अडकून विविध विषयभोगांत अत्यंत आसक्त होऊन इंद्रियतृप्ती मध्येच रममाण होतात आणि अपवित्र अश्या नरकामध्ये जातात.
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १६-१७ ॥
स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडी आणि उद्धट आसुरी प्रवृत्तीचे लोक लोक धन आणि मान यांच्या खोट्या दिखाव्याने उन्मत्त होऊन विधींचे पालन न करता केवळ दिखाव्यासाठी पाखंडीपणाने यज्ञ करतात.
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १६-१८ ॥
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १६-१९ ॥
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ १६-२० ॥
अहंकार, ताकत, घमेंड, आसक्ती आणि क्रोध यांच्या आहारी गेलेले आसुरी वृत्तीचे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये स्थिर असलेल्या मज भगवंताचा द्वेष करतात. आणि अश्या क्रूर, द्वेष करणाऱ्या, पापी नराधमांना मी अनंतकाळासाठी या संसारातील विविध आसुरी योनींतच टाकतो.
हे कौंतेया, वारंवार आसुरी योनीत जन्म घेतलेले लोक पुढे पुढे अधिक अधम गतीला जातात आणि त्यामुळे त्यांना माझी प्राप्ती शक्य होत नाही.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 61) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण

जय श्री कृष्णा ....
उत्तर द्याहटवा