63) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- नरकाचे महाद्वार:



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

63) नरकाचे महाद्वार:

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ १६-२१ ॥

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ १६-२२ ॥

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ १६-२३ ॥

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ १६-२४ ॥



भगवंत पुढे महत्वपूर्ण माहिती अतिशय स्पष्टपणे देतात ....
काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे ( नरकाच्या महामार्ग ) आहे आणि म्हुणुनच ज्ञानी मनुष्याने या तिन्हींचा त्याग करावा. हे कौंतेया जो मनुष्य या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला आहे तो पुरुष साहजिकच योग्य असे आचरण करतो आणि परम गती मिळवितो. अर्थात मला येऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून मनमानी पद्धतीने वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही किंवा परम गती मिळत नाही. म्हणून मनुष्याने शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून, नीती आणि अनीतीची जण ठेवून काय करावे आणि काय करू नये, हे जाणून शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करावे, असे केल्याने त्या मनुष्याची क्रमश: प्रगती होते. इथे अध्याय १६. श्लोक ७ पुन्हा पाहणे समजण्याच्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 62) आसुरी स्वभावाचे मनुष्य आचरण (भाग 2)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ