64) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रध्देचे तीन प्रकार



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

64) श्रध्देचे तीन प्रकार

अध्याय १७ श्रद्धात्रय विभाग योग

भूमिका

अध्याय १६. श्लोक १७ मध्ये अविधीपूर्वक यज्ञ करणाऱ्यांना भगवंतानी दंभ म्हंटले आहे आणि हे जाणून घेतल्यानंतर अर्जुनाच्या मनात स्वाभाविक प्रश्न आला आणि अर्जुनाने विचारले,

अर्जुन उवाच;

ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १७-१ ॥

हे श्रीकृष्ण, जी माणसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधींचे पालन न करता केवळ स्वतःच्या पद्धतीने श्रद्धायुक्त होऊन पूजा अर्चा करतात, त्यांची स्थिती कोणती? ते सात्त्विक, राजस की तामस?

श्रीभगवानुवाच;

त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ १७-२ ॥

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥

यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ १७-४ ॥

यावर भगवंत म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय पद्धतीनुसार नसलेली भक्ती हि केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारची असते. त्याची माहिती आता माझ्याकडून ऐक. हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या गुणानुरूप असते आणि हे गुण प्रकृतीच्या द्वारे उत्पन्न होतात. प्रत्येक पुरुष हा गुणांनुसार श्रद्धामय आहे. आणि जसे गुण तशी श्रद्धा हे तू जाण.

सात्विक मनुष्य देवतांची पूजा करतो, राजसी मनुष्य राक्षसांची पूजा करतो आणि तामसी मनुष्य भूत-प्रेतांची पूजा करतात.

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ १७-५ ॥

कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
 मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ १७-६ ॥

शास्त्राविरुद्ध जाऊन अहंकारवंश, अमर्याद इच्छपूर्तीसाठी, म्हणजेच  प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी घोर कर्म ( सकाम कर्म ) करतात आणि याद्वारे ते शरीर आणि त्यात वास करणाऱ्या परमात्म्याला सुद्धा कष्ट देतात आणि अश्या प्रवृत्तीच्या मनुष्याला असुर म्हणतात. येथे विशेष समजून घेण्याची बाब हि आहे कि अनियंत्रित कामना आणि महत्वाकांक्षा मनुष्याच्या देह आणि अंतरात्मा दोहोंसाठीही त्रासदायक ठरतात. आजच्या काळातील बहुतांश लोक हे ऐन तारुण्यात विविध रोग आणि व्याधीने ग्रस्त आहेत आणि याचे कारण हि असुरी वृत्ती आहे. श्री भगवंतांनी या आधीही हा मुद्दा अध्याय ३.३७ मध्ये स्पष्ट केला आहे. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः। महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।3.37।। येथे वाचकरूपी अर्जुनाने पुन्हा ह्या श्लोकाचे विवेचन अभ्यासने आणि रजोगुणी वृत्तीला स्वतःच्या मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीमध्ये बाधक बंध समजून या वृत्तीचा त्याग करणे आवश्यक आहे.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 63) नरकाचे महाद्वार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ