65) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- आहाराचे तीन प्रकार



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

65) आहाराचे तीन प्रकार

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ १७-७ ॥

श्लोक ७ ते १० मध्ये भगवंत आहाराचे तीन प्रकार सांगत आहेत जसे सतो, रजो, तमो गुण आहेत तसेच सत, रज, तम प्रकारचे आहार सुद्धा इथे वर्णित आहे. यासोबतच यज्ञ, तप व दान याच्या तीन प्रकारची माहिती भगवंत श्लोक ११ ते २२ मध्ये देतात. श्रीभगवान म्हणाले, भोजनही, भोजन करणाऱ्याच्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे असते. आणि तसेच यज्ञ, तप व दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्या सर्वांची वैशिष्ट्ये आणि भेद आता तू माझ्याकडून ऐक.

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १७-१० ॥

ज्या भोजनाद्वारे आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढते असे, रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि ह्रदयाला स्वास्थ आणि संतुष्टी देणारे भोजन सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात.

तर कडवट, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे अन्नपदार्थ जे कि दुःख, काळजी व रोग निर्माण करतात ते राजसी माणसांना आवडतात.

आणि हे पार्थ लक्षात घे कि भोजनाच्या एक प्रहर आधी शिजवलेले, रस नसलेले, दुर्गंध असलेले, शिळे, नासलेले आणि उष्टे असे अन्नपदार्थ जे कि त्यांच्या अशुद्धीमुळे त्याग करण्यास योग्य असतात ते भोजन तामसी लोकांना भावते.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 64) श्रध्देचे तीन प्रकार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ