66) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
66) तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ १७-११ ॥
अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १७-१२ ॥
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १७-१३ ॥
आता भगवंत तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती देतात, भगवंत म्हणाले कि श्रीमदभगवद्गीता अध्याय २ श्लोक ९ ते १६ मध्ये आपण यज्ञ आणि यज्ञाची महिमा जाणून घेतली. मित्रानो आपण आयुष्यात धेय्य प्राप्तीसाठी विविध यज्ञ करत असतो आणि या यज्ञाचे हे तीन प्रकार आपल्याला नेमका कोणता यज्ञ इष्ट आहे याबाबत मार्गदर्शन करतात तर आपण श्रीकृष्ण भगवंतापासून तीन प्रकारचे यज्ञ समजून घेऊया. भगवंत सांगतात, शास्त्रात वर्णित विधीनुसार तसेच फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य म्हणून जो यज्ञ केला जातो तो इष्ट म्हणजेच सात्विक यज्ञ होय. निष्काम कर्म करण्याचे इथे पुन्हा एकदा भगवंतांनी सांगितले आहे.
याविरुद्ध शास्त्रातील पद्धतीला न वापरता, प्रसाद वितरित न करता, म्हणजेच भगवंताला यज्ञफळ अर्पित करून त्याचे वाटप न करता स्वतः संपूर्ण यज्ञफळावर स्वामित्व गाजवण्याची इच्छा असणे. तसेच गुरुजनांना दक्षिण न देता, म्हणजेच यज्ञकर्मात मार्गदर्शक आणि मदतपूर्ण ठरलेल्या सर्वांप्रती धन्यवाद भाव न ठेवता. श्रध्दा न ठेवता म्हणजेच मनात शंका ठेवून अविश्वासाने केले गेलेले यज्ञकर्म राजसी यज्ञकर्म जाणावे.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 66) आहाराचे तीन प्रकार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा