67) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तप आणि तपाचे तीन प्रकार
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
67) तप आणि तपाचे तीन प्रकार
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १७-१४ ॥
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७-१७ ॥
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥ १७-१८ ॥
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १७-१९ ॥
आता भगवंत तप आणि तपाचे तीन प्रकार याविषयी मार्गदर्शन करतात.
भगवंत सांगतात देव, ब्राह्मण, मार्गदर्शक गुरू व जेष्ठ ज्ञानी यांची पूजा करणे, तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा आचरण ह्या सर्वाना शारीरिक तप म्हटले जाते. शरीराप्रमाणे वाणीचा संयम म्हणजेच तप सुध्दा अतिशय महत्वाचे आहे आणि भगवंत सांगतात कि जे दुसऱ्याला न हिणवणारे, सत्यप्रिय, हितकारक शब्दप्रयोग, तसेच वेदशास्त्रांचे पठण हेच वाणीचे तप म्हटले जाते. आता मनाच्या तप काय हे जाणून घेऊया. मानसिक समाधान, सौम्यता, अंतकरण शुद्दीसाठी मौन, आत्मसंयमन, शांत भाव, तपस्या हे सर्व मनाचे तप होय. कोणतीही फळाची इच्छा न करता केवळ भगवान विष्णूलाच सर्व कारणांचे कारण मानून त्यांच्याप्रित्यर्थ अत्यंत श्रद्धेने केलेल्या तिन्ही प्रकारच्या शरीर, वाणी आणि मनाच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात.
जे तप सत्कार किंवा सन्मान मिळविण्यासाठी , स्वतःचे श्रेष्ठत्व साधण्यासाठी, स्वतःची पूजा करवून घेण्यासाठी किंवा मनातील ईच्छा पूर्ण पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच नाशवंत क्षणिक फळ देणारे तप येथे राजसी तो होय. आणि जे तप हट्टपूर्वक, स्वतःला ( शरीर आणि आत्म्याला ) त्रास करवून घेऊन किंवा दुसऱ्यांचे नुकसान तथा अनिष्ट करण्याच्या हेतूने केले जाते, ते तप तामसी तप होय.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 66) तीन प्रकारच्या यज्ञाबद्दल माहिती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा