68) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- दान आणि दानाचे प्रकार



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

68) दान आणि दानाचे प्रकार

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ १७-२० ॥

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ १७-२१ ॥

अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ १७-२२ ॥

आता आपण दान आणि दानाचे प्रकार समजून घेऊया, भगवंत सांगतात कि दान सुद्धा तीन प्रकारचे आहेत. ते जाणण्याआधी वाचकरूपी अर्जुनास आचरण संबंधी सूचनावजा विनंती. आहार, यज्ञ, तप व दान याचे तीन प्रकार समजून योग्य आचरण करणारी व्यक्ती नक्कीच चांगले चित्त, चांगली नाती, चांगले आरोग्य उपभोगून मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीस प्राप्त होतो. 

दानाविषयी भगवंत सांगतात, केवळ कर्तव्य म्हणून स्वामित्वाच्या भावाशिवाय, योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य ( पात्र ) व्यक्तीला कोणत्याही परताव्याची आशा न ठेवता दिलेले दान हे सात्विक दान ओळखावे. म्हणजेच योग्य दान ही निश्चयपूर्वक करावयाची गोष्ट आहे. योग्यता पारखूनच दान द्यावे.

भगवंत पुढे सांगतात, परतफेडीची अपेक्षा ठेवून , किंवा दानयोगातून विशिष्ट फळाची आशा ठेवून, मनाविरुद्ध संकुचित वृत्तीने, अयोग्य प्रमाणात, जे दिले जाते ते दान राजसी जाणावे. आणि अयोग्य वेळी, मनात आले तेव्हा, अपात्र व्यक्तीला ( मनात आले त्याला ), अनादराने, घेणाऱ्याचा ( याचकाचा ) सन्मान न ठेवता, दिलेले दान तामसी होय.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 67) तप आणि तपाचे तीन प्रकार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ