69) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ॐ तत्‌ सत्‌ ची माहिती आणि महात्म



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः । ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ १७-२३ ॥

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ १७-२४ ॥

ॐ तत्‌ सत्‌ ची माहिती आणि महात्म

आता आपण ॐ तत्‌ सत्‌ अशी तीन प्रकारची परमात्म्याची नावे आणि त्यांचा वापर समजून घेऊया. याआधीच भगवंतांनी सांगितले आहे कि अनन्य भक्ती हाच मनःस्वास्थ मनशांती आणि प्रगती म्हणजेच भगवद्भक्तीचा सहज, सुंदर आणि सोपा मार्ग आहे. मनुष्य जेंव्हा नानाविविध कर्में करत असतो जसे कि आहार, विहार, यज्ञ, दान, तप तेव्हा तो त्रिगुणांनी बांधला जातो आणि या बंधातून मुक्तीचा सोपा मार्ग म्हणजेच सर्व काही भगवंताला अर्पित करायचे आणि त्याची विधी भगवंतांनी इथे सांगितली आहे. भगवंत सांगतात कि सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच ॐ तत्‌ सत्‌ हे तीन शब्द अंतिम परमसत्य दर्शविण्यासाठी वापर केले जाते. ब्राह्मण वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या परमपुरुषांचा शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ करतात. म्हणजेच ते आरंभ परमेश्वराला अर्पण करतात. कारण परमेश्वर सर्व कारणाचे कारण आणि सर्व उत्पत्तीचे बीज आहेत श्रीमदभगवगीता अध्याय ७ श्लोक ८ ते १२ . त्यामुळे सर्व आरंभ करतांना 'ॐ ' उच्चार करून परमेश्वराला अर्पण करणेच योग्य आहे.

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ १७-२५ ॥

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । 
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ १७-२६ ॥

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
 कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ १७-२७ ॥

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् । 
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ १७-२८ ॥

निष्काम भावाने फळाची आशा न करता मनुष्याने यज्ञ तप आणि दान आदी कर्म करावेत आणि 'तत्' शब्दांद्वारे सर्व कर्म आणि कर्मफले भगवंताला अर्पण करावीत. म्हणजचे भौतिक प्रकृतीमध्ये कर्म करत असतांना मनुष्य बंधनमुक्त राहतो. आणि हाच या क्रियांचा उद्देश आहे. 'सत्'‌ म्हणजेच परमात्मा. भगवंत अनेकदा सांगतात कि नश्वर आणि अनश्वर यापलीकडे असलेला परमात्मा अजन्मा, निरंतर आणि सर्वव्यापी आहे. 

भगवंतच एकमात्र सत्य आहेत आणि 'सत्'  शब्दाचा वापर आपल्याला सतत या सत्याची जाणीव करून देतो. परमात्मा आहे आणि केवळ परमात्म्याला अर्पण केलेली यज्ञ, तप, दर्प, कर्मे 'सत्' आहेत. आणि म्हणूनच हे पार्थ परमेश्वरावर श्रद्धा न ठेवून केले जाणारे यज्ञ, तप आणि दानकर्म हे अनित्य तथा असत् असून ते करणे केवळ निरर्थक किंवा व्यर्थ ठरते आणि अश्या विधींचा मनुष्याला या किंवा पुढच्या जन्मात ( वर्तमान तथा भविष्यात देखील ) काहीही लाभ होत नाही. 


ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 68) दान आणि दानाचे प्रकार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ