71) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- त्यागाचे प्रकार
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
71) त्यागाचे प्रकार
नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ৷৷१८-७৷৷
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ৷৷१८-८৷৷
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेअर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ৷৷१८-९৷৷
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ৷৷१८-१०৷৷
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ৷৷१८-११৷৷
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् ৷৷१८-१२৷৷
आता भगवंत त्यागाचे प्रकार सांगतात, भगवंत म्हणतात, नियत कर्माचा कधीही त्याग करू नये. जेव्हा मनुष्य मोहास बळी पडून जसे कि आळस, निद्रा ई. साठी नियत कर्माचा त्याग करतो तेव्हा या त्यागाला तामसी त्याग असे जाणावे. जेव्हा मनुष्य नियत कर्माना कर्माच्या कठिणतेपोटी किंवा त्यासाठी लागणारे कष्ट किंवा उचलावा लागणारा त्रास याच्या चिंतेने भय अथवा चिंताग्रस्तच होऊन नियतकर्माचा त्याग करतो तेव्हा त्या त्यागाला राजसी त्याग असे जाणावे. असा त्याग कधीही मनुष्याला कधी प्रगतीपथावर नेत नाही.
हे अर्जुन! या दोहोंविपरीत जेव्हा मनुष्य केवळ कर्तव्य करण्याच्या भावनेने नियत कर्म करतो आणि वस्तू व्यक्ती आणि विचार याच्या संगतीविषयी आसक्त न होता आणि फलाची आसक्ती सोडून नियत कर्म करतो त्यालाच त्याग म्हणजेच सात्विक त्याग असे जाणावे.
भगवंत पुढे मार्गदर्शन करतात कि सात्विक त्यागी मनुष्य शुभ अशुभ कर्माचा अनुक्रमे इच्छा किंवा द्वेषही करत नाही. अश्या सात्विक त्यागी व्यक्तीला कर्मविषयी काहीच संशय नसतो. म्हणजेच अशी व्यक्ती कर्म आणि कर्मफल याबाबत स्थिरबुद्धी असते आणि सर्वकाही भगवंत श्रीकृष्णाला अर्पण करून केवळ आपले नियत कर्म रुपी कर्तव्य करत असते.
वस्तुंस्थिती हि आहे कि भौतिक शरीर धारण केलेल्या कोणत्याही जीवाला सर्वकर्म त्याग करणे शक्य नाही. आणि हे जाणून जो कर्मफल त्यागाचे व्रतं आचारतो तोच खरा त्यागी होय. जो कर्मफल त्याग करत नाही त्याला मृत्यूनंतर ( कर्म पूर्ण झाल्यानंतर किंवा कालचक्राच्या बदलानंतर ) अपेक्षित, अनपेक्षित आणि मिश्र असे फल मिळते आणि हि फळे नक्कीच पुढील सुख दुःख, असमाधान अशी बंधने निर्माण करतात पण जे खरे सात्विक त्यागी आहे ( संन्याशी आहेत ) त्यांना त्यांनी केलेल्या नियत कर्माचे कोणतेही फल रुपी बंधन निर्माण होत नाही. म्हणजेच न सुख न दुःख न असमाधान.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 70) त्याग आणि संन्यास

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा