72) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मसिद्धीसाठी पाच कारणे
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
72) कर्मसिद्धीसाठी पाच कारणे
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ৷৷१८.१३৷৷
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ৷৷१८.१४৷৷
शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः৷৷१८.१५৷৷
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ৷৷१८.१६৷৷
यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ৷৷१८.१७৷৷
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः ৷৷१८.१८৷৷
भागवन्त पुढे सांगतात हे महाबाहो अर्जुन! सांख्य योगात कर्मसिद्धीसाठी एकूण पाच कारणे सांगितलेली आहेत. ती आत तू मझ्याकडून नीट जाणून घे. या कारणांमध्ये प्रार्थं अधिष्ठान म्हणजे हे भौतिक शरीर, दुसरे कर्ता प्रकृतीच्या तीन गुणांद्वारा ( 3:27 ) कर्म करणारी कर्मेंद्रिये, तिसरे करणम् म्हणजे आपल्याला माहिती पुरवणारी ज्ञानेंद्रिये, ज्यांच्या मानसोबतच्या संयोगाने कर्म करण्याची इच्छा उत्पन्न होते, चवथे म्हणजे, विविध प्रकारच्या चेष्टा - म्हणजेच वेगवेगळे प्रयत्न आणि पाचवे म्हणजे दैव, भाग्य किंवा परमात्म्याची इच्छा असेही म्हणतात.
मनुष्य शरीर, वाचा आणि मन यांच्या एकत्रित किंवा भिन्न भिन्न मान्य तथा अमान्य चेष्टेने जे काही कार्य आरंभिले जाते त्याला हि पाचच कारणेच
आहेत. या पाच कारणांचा बोध नसल्यामुळे ज्याला वाटते कि मी स्वतःच एकमेव कर्ता आहे तो नक्कीच अल्पबुद्धी असा मूर्ख आहे आणि तो खरे सत्य समजू शकत नाही. जी व्यक्ती ज्ञान प्राप्ती झाल्याने खोटा अहंकार विसरून स्वतःला कर्ता न मानता आणि कोणत्याही कर्म तथा कर्मफळाशी संग न करता कार्य करतो असा व्यक्ती कोणत्याही बंधनात बांधला जात नाही. इथे धनुर्धर अर्जुनाच्या बाबतीत भगवंत सांगतात कि असा मनुष्य जगातील मनुष्याला मारूनही त्या कर्माद्वारे मारेकरी होत नाही म्हणजेच कर्मबंधनातून मुक्त राहतो. ज्ञान ( सत्य काय आहे याची जाण ), ज्ञेय ( जाणण्यायोग्य काय आहे याची जाण ) आणि ज्ञाता ( मनुष्य अंतःकरणात वास करणारा सर्वसाक्षी परमात्मा ) ह्या तीन सर्व कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कारण ( इंद्रिये ), कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. यात पहिल्या तीन मुद्यांमध्ये मनुष्याच्या कर्माच्या उत्पन्न होण्यासाठीची मानसिक स्थिती आणि ज्ञानाची पातळी आणि दुसऱ्या भागात त्याची भौतिक ( शारीरिक आणि परिस्थितीक) स्थिती ह्यांच्या संयोगातूनच कर्माची प्रेरणा आणि कर्म होत असतात.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 71) त्यागाचे प्रकार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा