73) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति आणि सुख चे पृथक-पृथक भेद



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

73) तीन गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति आणि सुख चे पृथक-पृथक भेद

ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छ्णु तान्यपि
৷৷१८.१९৷৷

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ৷৷१८.२०৷৷

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ৷৷१८.२१৷৷

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्। 
अतत्त्वार्थवदल्पंच तत्तामसमुदाहृतम्৷৷१८.२२৷৷

आपल्या माहीत असलेल्या प्रकृतीच्या तीन गुणांना (
 सत्, रज, तम ) अनुसरूनच ज्ञान, कर्म आणि कर्ता हे तीन-तीन प्रकारचेच सांगितले आहेत. ते तू आता  माझ्याकडून नीट ऐक. 

ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व जीवांमध्ये एक अविनाशी परमात्माच समभावाने पाहतो ते ज्ञान तू सात्त्विक जाण. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व जीवांमध्ये आपल्या मतानुसार आणि गरजेनुसार भिन्न भिन्न प्रकारे उपभोग किंवा उपयोग करण्याच्या दृष्टीने पाहतो वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण. परंतु जे ज्ञान मनुष्याला जगाविषयी अनभिज्ञ होऊन कोणतयाही एकाच कार्यात ( शक्यतो निरर्थक ) आसक्त करते असे हे ज्ञान अत्यल्प असून सत्यापासून दूर ठेवते. ते ज्ञान तामस ज्ञान जाण.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 72) कर्मसिद्धीसाठी पाच कारणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ