75) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्ता व त्याचे तीन प्रकार



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

75) कर्ता व त्याचे तीन प्रकार

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्धयसिद्धयोर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते৷৷१८.२६৷৷

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः৷৷१८.२७৷৷

आयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठोनैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते৷৷१८.२८৷৷

आता आपण कर्ता व त्याचे तीन प्रकार बघुयात
जो कर्ता गुणांचा संग न बाळगता म्हणजेच सवयींना बळी न पडता, आसक्ती न बाळगता, स्वामित्व व अहंकारभाव न बाळगता , धैर्य व उत्साहाने, कार्य होईल अथवा न होईल याची व्यर्थ तमा न बाळगता, आपले कर्म करतो त्याला तो सात्त्विक कर्ता मानावे.

जो कर्ता आसक्तीयुक्त असून, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगतो, लोभ,मत्सर,ईर्षा  सुखदुःख भाव असलेला, अशुद्ध आचरणाचा असा कर्ता राजस म्हटला जातो.

शास्त्र संकल्पना आणि मार्ग याच्या विरुद्ध कार्य करणारा भौतिक सुखात लिप्त, हट्टी, धूर्त, अनिष्ट ते कृत्य करणारा, आळशी, दुःख कवटाळून धरणारा, कामामध्ये तत्पर नसलेला कर्ता तामस म्हटला जातो

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 74) तीन प्रकारचे कर्म

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ