76) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- बुद्धीचे व धृतीचे भेद
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
76) बुद्धीचे व धृतीचे भेद
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श्रृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय॥ १८-२९ ॥
भगवंत पुढे म्हणाले, हे धनंजया! प्रकृतीच्या तीन गुंनुसार आता मी बुद्धीचे व धृती ( दृढनिश्चय ) याचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक तू ऐक.
प्रवत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये।
बन्धं मोक्षं च या वेति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी॥ १८-३१ ॥
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी॥ १८-३२ ॥
हे पार्थ! ज्या बुद्धीद्वारे प्रवृत्ती आणि निवृत्ती, करण्यास योग्य आणि अयोग्य ( करणीय व अकरणीय), भय आणि निर्भयता, बंधन आणि मुक्ती यातील भेद जाणतो ती बुद्धी सात्विक बुद्धी होय.
शास्त्रानुसार स्थळ, वेळ परत्वे मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीसाठी, योग्य, अयोग्य निर्णय घेण्यासाठी मदतगार ठरते ती बुद्धी सात्विक होय.
हे पार्था, ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यातील भेद मनुष्य जाणू शकत नाही, ती बुद्धी राजसी होय. आणि भ्रम आणि अज्ञानरूपी अंधाराच्या प्रभावाने जी बुद्धी अधर्माला धर्म आणि धर्माला अधर्म समजते आणि सदैव शास्त्रविपरीत कार्य करायला प्रवृत्त करते ती बुद्धी म्हणजेच तामसी बुद्धी होय.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 75) कर्ता व त्याचे तीन प्रकार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा