77) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकार



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

77) निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकार

त्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः। 
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ৷৷१८.३३৷৷

यया तु धर्मकामार्थान्धत्या धारयतेऽर्जुन। 
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी৷৷१८.३४৷৷

यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च।
 न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी৷৷१८.३५৷৷

भगवंत आता निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार असलेले तीन प्रकार सांगतात.

भगवंत म्हणाले, हे पार्था, जो अटल आहे, ध्यान प्रक्रियेने दृढ केलेला आहे, मन, प्राण आणि इंद्रियांच्या नियंत्रणाने धारण केलेला निश्चय सात्त्विक होय. परंतु हे अर्जुना!, ज्या निश्चयाने मनुष्य सकाम कर्मात गुंतत जातो जसे धार्मिकता, धन आणि इंद्रियतृप्तीसाठी उत्पन्न झालेल्या नवनवीन इच्छा व त्यापासून मिळणाऱ्या फळांना आसक्त होतो तो निश्चय राजसी होय.

हे पार्थ! जो निश्चय मनाचे विविध खेळ जसे कि भय, स्वप्न, आशा, विषाद, मोह ई च्या पलीकडे जात नाही असा कधीही वास्तवात न येणारा निश्चय तामसी निश्चय होय.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 77) बुद्धीचे व धृतीचे भेद

टिप्पण्या

  1. धृत्या य या धार यतेमनः प्राणेद्रि यक्रिया: जो निश्चय अचल आहे,जो योगाभ्यास द्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन,प्राण, इंद्रियांच्या क्रियांना सं य मी त करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय.

    उत्तर द्याहटवा
  2. परमात्म्याला ओळखण्याचे योग हे एक माध्यम आहे.जो कृष्ण भावना मध्ये विलीन होतो तो माणूस आपले मन,प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया दृढ करून धैर्य ने परमेश्वर ठिकाणी मग्न होतो व कोणत्याही कार्याने विचलित होत नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ