78) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सुख आणि सुखाच्या तीन प्रकारांची माहिती
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
78) सुख आणि सुखाच्या तीन प्रकारांची माहिती
सुखं त्विदानीं त्रिविधं श्रृणु मे भरतर्षभ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति৷৷१८.३६৷৷
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्৷৷१८.३७৷৷
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्৷৷१८.३८৷৷
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्৷৷१८.३९৷৷
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिःस्यात्त्रिभिर्गुणैः৷৷१८.४०৷৷
सुखांच्या तीन प्रकारांची माहिती देतांना भगवंत म्हणतात. हे भारतश्रेष्ठ! भौतिक प्रकृतीशी जोडले गेलेले बद्ध जीव जे तीन प्रकारचे सुख उपभोगतात आणि ज्यमुळे दुखाःचा अंत ( बरेचदा तात्पुरता अंत ) होतो त्या तीन प्रकारच्या सुखाविषयी आता माझ्याकडून ऐक.
जे सुख कार्याची सुरुवात करतांना अतिशय कष्टप्रद व विषासमान असहनीय वाटते परंतु शेवटी अमृतासमान गोडी आणि सुख देते जे मनुष्याला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देते आणि आत्मसाक्षात्काराची जाणीव घडवते त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात.
इंद्रियांतुन उत्पन्न झालेल्या विविध इच्छांची पूर्ती केल्याने मिळणारे सुख जे सुरवातीला अमृतासम मधुर वाटते आणि शेवटी विषासम जहाल होते असे सुख राजसी समजावे.
ज्यांना जीवनसत्याचे आणि आत्मसाक्षात्काराचे भान राहत नाही जे सुरवातीपासून शेवटपर्यंत आळस, निद्रा आणि प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसी सुख मानावे. भगवंत पुढे सांगतात कि या पृथ्वीलोकांत आणि याव्यतिरिक्त सर्वंप्राणीमात्र तथा देवदेवता पैकी असा कुणीही नाही जो या प्रकृतीच्या तिन्ही गुणांनी बांधला गेलेला नाही.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 77) निश्चय आणि त्याचे प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तीन प्रकार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा