79) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- फल सहित वर्ण धर्म चा विषय



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

79) फल सहित वर्ण धर्म चा विषय


ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः৷৷१८.४१৷৷

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ৷৷१८.४२৷৷

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्৷৷१८.४३৷৷

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्৷৷१८.४४৷৷

प्रकृतीच्या तिन्ही गुणांचा मनुष्याच्या जीवनावर होणारा विविध प्रकारचा प्रभाव सांगितल्यानंतर भगवंत आता मनुष्याचे चार वर्ण याविषयी पुन्हा एकदा सांगतात, भगवंत म्हणाले कि हे परंतप, मनुष्याचे चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे सुद्धा वर्गीकरण प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे उत्पन्न स्वभावानुसार केले गेले आहे. याविषयी भगवंतांनी भगवद्गीता अश्या ४. श्लोक १३ मध्ये सुद्धा याचे वर्णन केलेले आहे.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।४.१३।।

आता अध्याय आठ मध्ये भगवंत प्रकृतीच्या गुणांना अनुसरून त्यांची कर्मे कोणती यावर प्रकाश टाकतात. भगवंत म्हणाले, मनोनिग्रह, शांती, तपस्या, इंद्रियांवर ताबा ठेवणे, सहनशीलता, अंतर्बाह्य शुद्ध वृत्ती, क्षमाशीलता, मन, इंद्रिये व प्रामाणिकपणा, वेदशास्त्र, ईश्वर यांचे ज्ञान, बुद्धीचातुर्य, या गुणांनुसार ब्राह्मण त्याची स्वाभाविक कर्मे करत असतात.

जर क्षत्रियांचा विचार केला तर शोर्य, तेज, दृढनिश्चय, दक्षता, युद्धामध्ये निडरपणे टिकून राहण्याची वृत्ती, दान, ईश्वरभाव पालनपोषण आणि नेतृत्व कारणे या स्वाभाविक गुणांना अनुसरून क्षत्रिय कर्म करत असतात.

कृषी, गोपालन, व्यापार हे व्यावसायिक असलेल्या वैश्याचे स्वभावजन्य कर्म आहेत आणि सेवा आणि श्रम हे स्वभावजन्य कर्म शूद्र करत असतात.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 78) सुख आणि सुखाच्या तीन प्रकारांची माहिती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ