80) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी कसा प्राप्त करू शकतो
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
80) वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी कसा प्राप्त करू शकतो
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु৷৷१८.४५৷৷
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः৷৷१८.४६৷৷
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्৷৷१८.४७৷৷
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः৷৷१८.४८৷৷
मनुष्याचे गुणकर्मानुसार चार वर्ण सांगितल्यानंतर भगवंत सांगतात कि, वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो आणि ते कसे शक्य आहे हे आता तू माझ्याकडून ऐक. असे म्हणून भगवंत सांगतात कि सर्वजीवांचे बीज आणि कारणस्वरूप असलेल्या सर्वव्यापी असलेल्या मज भगवंताची पूजा करून आणि आपले स्वकर्म करून सर्व मनुष्य मग ते कोणत्याही वर्णाचे असोत ते सिद्धी प्राप्त करू शकतात.
याबाबत पूर्वीसुध्दा भगवंतांनी मार्गदर्शन केलेले आहे
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ।।८.७ ।।
इथे सुद्धा भगवंत अर्जुनाला म्हणाले कि सदैव माझे नामस्मरण कर आणि युद्ध करण्याचे आपले कर्तव्य कर अश्या तर्हेने तू मला प्राप्त करू शकशील आणि जो नियम अर्जुनाला सांगितलं आहे तोच नियम भगवंत सर्वाना सांगत आहेत. भगवंत जसे अर्जुनाला म्हणाले कि
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।३.३५।।
त्याचप्रमाणे भगवंत पुन्हा एकदा इथे सांगतात कि प्रत्यक्ष मनुष्याने आपले नियत नित्य कर्म कर्तव्य म्हणून करावेत, मग ते दोषपूर्वकच का असेना हे इतर कुणाचे कर्म आचरण्यापेक्षा श्रेयसकर आहे. जस कि गरुडाने उंच भरारी घ्यावी आणि बया पक्षाने सुंदर खोपा बांधावा. ज्याने त्याने आपले नियत कर्म करावे व इतरांचे अनावश्यक अनुकरण करू नये. केवळ आपले स्वाभाविक कर्म करावे. स्वधर्माला अनुसरून नियत कर्म करणाऱ्या मनुष्याला पाप आणि अपराधी भाव कधीही शिवत नाही. आत भगवंत सुंदर उदाहरणाद्वारे सांगतात हि ज्याप्रमाणे दिव्याचा अग्नी धुराने आवृत होतो त्याच प्रमाणे प्रत्येक कर्मात काही ना काही दोष हे असतातच आणि त्यामुळेच हे कौंतेय मनुष्याने मनोविकारांना अधिक चालना न देता आपले स्वभावजन्य कर्म करत राहिले पाहिजे आणि हे कर्म कितीही दोषपूर्ण असले तरी मनुष्याने त्यानाच त्याग करणे योग्य नाही.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 79) फल सहित वर्ण धर्म का विषय

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा