84) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीभगवानकृष्णांनी दिलेला अंतिम उपदेश
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
84) श्रीभगवानकृष्णांनी दिलेला अंतिम उपदेश
सर्वगुह्यतमं भूतः श्रृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ৷৷१८.६४৷৷
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ৷৷१८.६५৷৷
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ৷৷१८.६६৷৷
अर्जुनरूपी वाचकाला उद्देशून केलेला हा अंतिम उपदेश आहे, श्रीभगवान कृष्ण म्हणाले, तू मला अत्यंत प्रिय असल्यामूळे . भगवंताला प्रिय कोण आहे याचे वर्णन भगवंतांनी याआधीच ॥ १२-१३ ॥ आणि ॥ १२-१४ ॥ मध्ये केलेले आहे
( अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥ )
मी तुला सर्व ज्ञानातील अतिशय मौल्यवान आणि गुप्त असे ज्ञान पुन्हा एकदा निश्चयपूर्वक सांगतो ते तू स्वतःच्या भल्यासाठी पुन्हा एकदा ऐक. माझी अनन्यभावाने भक्ती कर, माझी पूजा कर, मला नमस्कार कर यामुळे तू नक्कीच मला प्राप्त होशील हे मी तुला सांगतो कारण तू मला अत्यंत प्रिय आहेत.
पुन्हा सांगतो असे म्हणायचे कारण भगवंतांनी विराट विश्वरूप दर्शन देण्याआधी सुद्धा पार्थाला हा उपदेश दिला होता.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ९-३४ ॥
सर्व धर्मत्याग करून मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून (बंधनातून) मुक्त करिन त्यामुळे तू चिंता करू नकोस. इथे एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे भगवंत भक्ती काय आहे. माझे असे मत आहे कि भगवंत भक्ती म्हणजे भगवंताच्या कार्यास आपला जीवन उद्देश मानून कर्म करणे. भगवंत कृष्ण अवतार संपवून त्यांच्या परमधामाला निघाले तेव्हा त्यानीं द्वारिका नगरी पुन्हा सागर देवतेला परत केली आली केवळ त्याची वाणी असलेली श्रीमदभगवद्गीता येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक म्हणून भेट दिली. आणि याच श्रीमदभगवद्गीतेच्या अध्याय ।।४.८।। मध्ये पुढील श्लोकानुसार भगवंताची पृथ्वीसंबंधित कार्याची भूमिका स्पष्ट केलेली आढळते
(परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥)
आणि सर्व मनुष्यांनी यानुसार पृथ्वीवर सज्जनांच्या उद्धार करणे, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करणे आणि धर्माचे उत्तम प्रकारे सुचालन करण्यासाठीच भगवंत अवतार घेतात. हाच आपल्या जन्माचा सुद्धा उद्देश मानून यासाठी प्रत्येक मनुष्याने आधी स्वतःच्या चांगल्या गुणांची वृद्धी, स्वतःतील दुष्प्रवृत्तींचा नाश आणि स्वधर्मानुसार आचरण. आणि नंतर हेच तिन्ही मुद्दे सामाजिक पातळीवर राबवणे म्हणजेच खरी भगवंत भक्ती आणि पूजा होय असते माझे मत आहे.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 83) श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचा अंतिम कर्मनिर्देश

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा