86) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य (भाग 2)


माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

86) श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य (भाग 2)

संजय उवाच;
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ৷৷18.74৷৷

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्৷৷18.75৷৷

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ৷৷18.76৷৷

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ৷৷18.77৷৷

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ৷৷18.78৷৷

संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्रीवासुदेव आणि पार्थ यां दोन महात्म्यांच्या हा अद्भुत आणि रोमहर्षक असा संवाद ऐकला. इथे संजय महात्मा वेद व्यास यांना धन्यवाद देतात आणि म्हणतात की, श्रीव्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग संवाद स्वतः भगवंत योगेश्वर श्रीकृष्णांकडून अर्जुनाला सांगत असताना प्रत्यक्ष ऐकला आहे. इथे चांगला गुरु किंवा संतांच्या कृपाशिर्वादाची गरज स्पष्ट होते. ज्यांच्याकडे दिव्य गुरूंचा आशीर्वाद आहे ते भाग्यवंत आहेत.

संजय पुढे म्हणाला हे महाराज धृतराष्ट्र, भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा शुभ, हितकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. आणि पुन्हा पुन्हा आठवून या शब्दांमध्ये वाचकरूपी पार्थासाठी काही छुपा संदेश आहे का? हे सुज्ञ वाचकांनी स्वतः ठरवावे. संजय पुढे म्हणाला हे महाराज, श्रीभगवान कृष्णाचे ते अत्यंत अलौकिक अद्भुत रूप वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षोउल्हासीत होत आहे. आता ह्या संवादाचा प्रत्यक्षदर्शी संजय आपले अंतिम मत नोंदवतांना म्हणतो कि जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे, तेथेच श्री (म्हणजे लक्ष्मी माता) संपन्नता, विजय ( सर्व विकारांवर ) , ऐश्वर्य सामर्थ्य, नीतिमत्ता आणि निश्चितच विजय आहे असे माझे मत आहे.  येथे श्रीमदभगवद्गीता संदेशाचा समारोप करतांना पुन्हा एकदा आयुष्यत सर्वांगीण विकासासाठी,  म्हणजेच मनस्वास्थ, मनशांती सह प्रगती करण्यासाठी भगवंत श्रीकृष्णरूपी महान सर्वज्ञ मार्गदर्शक आणि अर्जुनासम् सर्पित अनन्य भक्त असणे गरजेचे आहे. 

 ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 85) श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ