88) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- special episode 2
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
88) अध्याय २ श्लोक २३
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२.२३॥
गीतेचे अवतरण होत असलेल्या या भागात भगवंत जगातील परमसत्य सांगताना दिसतात, इथे परमेश्वर भगवान कृष्ण सांगतात कि आत्मा म्हणजेच कोणत्याही जीवाच्या शरीरातील चेतना ज्याला जीवन ऊर्जा किंवा जीवात्मा सुद्धा म्हटले जाते त्याला कोनोही मारू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, हा आत्मा (जीवन ऊर्जा) केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि सदैव चिरंतन असे त्याचे अस्तित्व आहे. हा योगायोग आहे का आणखी काही हे वाचकांनी ठरवलेले ज्यास्त संयुक्तिक ठरेल कि थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे. उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो. विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 87) special episode अध्याय २ श्लोक ७

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा