17)- माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- चतुर्थोऽध्यायः- ज्ञानकर्मसंन्यासयोग: दिव्य ज्ञान
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
17) अध्याय ४
अथ चतुर्थोऽध्यायः-
ज्ञानकर्मसंन्यासयोग: दिव्य ज्ञान
भाग १ : योग परंपरा, भगवान कृष्णाच्या जन्माची आणि कर्माची दिव्यता, खरा भक्त कोण व त्याची लक्षणे
श्री भगवानुवाच :
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥४:१॥
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥४:2॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥४:3॥
अर्जुन उवाच : अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥४:4॥
श्रीभगवानुवाच: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥४:5॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥४:६॥
या भागात जग, जगाची उत्पती, जगाला पुढे नेणारी प्राथमिक चेतन ( ऊर्जा ) आणि मानवी कुळाची प्रगती याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे, आधी आपण श्लोकाचा अर्थ बघुया आणि मग यामागील गूढ माहिती बघूया. श्री भगवान म्हणाले:- हे जे दिव्य ज्ञान मी तुला सांगतोय ते मी आधी सूर्यदेव विवस्वान ला सांगीतले होते आणि सूर्यदेवाने हे ज्ञान मानवांचा पिता मनू ला सांगितले. तसच मनूने हे ज्ञान इक्ष्वाकुला सांगितले. आशा प्रकारे हे ज्ञान परंपरेने राजर्षिनी जाणले व गुरुशिष्य परंपरेने हे ज्ञान मनुष्याच्या पुढील वंशजांना मिळत गेले, परंतु हे ज्ञान काळाच्या ओघात लोप पावत गेलं व त्याचे शुद्ध स्वरूप नाहीसे झाले. आणि आता हे ज्ञान मी तुला सांगत आहे कारण तू माझा मित्र तथा शिष्य आहेस. यावर अर्जुन स्वाभाविकपणे म्हणाला :- हे भगवन, सूर्यदेव विवस्वान तर ह्या जगाच्या उत्पत्ती चे स्रोत आहेत आणि मग मी हे कसं मानू कि तुम्ही हे ज्ञान त्यांना सांगितले होते? मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले:- हे अर्जुन, तुझे आणि माझे कितीतरी जन्म होऊन गेले आहेत. ते सगळे मला माहिती आहेत पण तू ते आठवू शकणार नाहीस.
जगाच्या आणि मानवी उत्पतीचा ५००० वर्षे आधी सांगितले कि जगातील चेतनेचा मूळ स्रोत सूर्यदेव आहेत आणि त्यांना हि चेतना स्वयं भगवंतापासून म्हणजेच विश्वातील सर्वोत्तम शक्तीद्वारे प्रदान केले गेले आहे. आणि हे ज्ञान गुरुशिष्य परंपरेने पुढे पुढे नवीन पिढ्याना प्राप्त होते. आजच्या या जगात वही किंवा वेब माध्यमातून लिहून ठेवलेले ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पुढे दिले जाते पण प्राचीन काळी मनुष्याने जगातील इतर प्राणिमात्राप्रमाणे केवळ अनुभव मोठ्यांकडून नव्या पिढीकडे दिले जात होते. उदाहरणार्थ हत्ती, डॉल्फिन या प्राण्यांमध्ये अजूनही या प्रकारे ज्ञान पुढील पिढीला प्राप्त होत असते जसे कि कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या भागात राहायचे, पाणवठे, अन्न उपलबध्दता इ. आता या श्लोकानुसार हे ज्ञान राजर्षिनी पुढील पिढीला दिले. राजर्षिनी म्हणजेच राजा आणि ऋषीचा संगम. राजा तो जो पालनपोषण आणि संरक्षण उपलबध करून देतो. आणि ऋषी हे ज्ञान, विधी आणि संस्कार देणारे. यापद्धतीने मनुष्य प्रजाती मनःस्वास्थ, मनशांती आणि प्रगती! करत आली. काळाच्या ओघात हे ज्ञान लुप्त झाले आणि मनुष्य त्याचे संस्कार, ज्ञान आणि प्रगती लुप्त झाली आहे आणि त्यामुळेच भगवंत पुन्हा हे ज्ञान अर्जुनाला म्हणजेच वाचकाला सांगत आहेत. हे ज्ञान म्हणजेच महामार्ग आहे मनःस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीचा. हे ज्ञान सर्वांसाठी नाही हे ज्ञान मिळविण्याची देखील पात्रता भगवंतांनी निश्चित करून सांगितली आहे. मित्र आणि शिष्य असलेली व्यक्ती है मनःस्वास्थ, मनशांती आणि प्रगती साधण्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पात्र आहेत, म्हणजेच समर्पण भाव असलेली ( शिष्य ) विश्वासपात्र जवळची व्यक्ती (मित्र ). हे सांगणे का आवश्य झाले आहे हे हि भगवंत सांगतात कि मनुष्य आपले पूर्वजन्म ( संस्कृती ) विसरला आहे आणि त्यामुळेच भगवंत हे दिव्य ज्ञान सांगत आहेत.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥४:६॥
श्लोक ६ मध्ये भगवंत सर्वोच्य शक्तीचे स्वरूप स्पष्ट करतात कि मी अजन्मा आणि अविनाशी आहे, म्हणजेच मी आधीपासूनच आहे आणि अविनाशी म्हणजेच कधीही नष्ट न होणारा आहे. आणि सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे कि सजीव आणि निर्जीव यांच्यातील मूळ फरक हा चेतनेचा ( ऊर्जेचा ) आहे. आणि परमेश्वर सर्वोच्य ऊर्जेचा स्रोत आहेत आणि मागील ४.५ कोटी वर्षांपासून अविरतपणे जगाला ऊर्जा देणारा सूर्य ( सूर्यदेव विवस्वान ) यांनासुद्धा परमेश्वराने चेतना दिली आहे.
पुढील भागात बघूया कि भगवंत मानव जन्म कधी घेतात आणि त्याची कारणे काय आहेत.
।। जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 16)-सर्व पापांचे मूळ असलेल्या इच्छा (काम) शत्रूला नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन.
भाग 18)- भगवंत अवतार का घेतात, कधी घेतात व त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा